Menu
Log in


Log in


This section of articles is to collect the information referring to the history we should be proud about. The content will beadded with reference to the source and the contributing person name keep the credits. Note that following the organisational non-political stand, articles relating to politics may be avoided.

  • 23 Jan 2022 6:25 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. 

    पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांंचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे नगरपालिका शाळेत झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालय, किंग जॉर्ज हायस्कूल मुंबई आणि महाविद्यालयीन शिक्षण बी.ए. तत्त्वज्ञान एल्फिस्टन महाविद्यालय, एम. ए. चे शिक्षण मुंबई विद्यापीठ येथे झाले.

    मे.पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ठ्ये होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्विवाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला.‘

    मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा-स्थिती आणि भवितव्य या विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे.

    त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्विस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले.

    त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठ्यपुस्तकांचेही लेखन केले. ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’,‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’,‘स्वातंत्र्य आणि न्याय’,‘हिदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे.

    २०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे निधन

    भीमसेन गुरुराज जोशी हे कर्नाटक चे भारतीय शास्त्रीय संगीताचे एक महान गायक होते. ते गायनाच्या खयाल या प्रकारासाठी प्रसिद्ध होते. सोबतच ते आपल्या प्रसिद्ध भक्तिमय भजनांसाठी हि फार पसंत केले जायचे. त्यांचे अभंगाचे गायन फार गाजले होते.

    पंडित भीमसेन जोशी यांच्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या गीतासाठी फार पसंत केले गेले. या गीतात बालमुरली कृष्णन आणि लता मंगेशकर यांनी साथ दिली. त्यांचे हे गीत देशाच्या प्रत्येक मनात भिडले आहे. आजही हे गाणे फार लोकप्रिय व देशभक्ती भरलेलं आहे. त्यांचे गायन सर्वांसाठी फारच प्रेरणादायक ठरले आहे.

    1998 मध्ये त्यांना संगीत नृत्य व नाटकांच्या क्षेत्रात अतुल्य योगादानांसाठी भारतीय राष्ट्रीय अकॅडमी च्या संगीत नाटक अकॅडमी ने संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार व संगीत नाटक अकॅडमी शिष्यवृत्ती देवून सन्मानीत केले होते.2009 मध्ये त्यांना भारतीय नागरिक सर्वोच्च पुरस्कार “भारतरत्न” प्रदान करण्यात आला.पंडित भीमसेन जोशी यांच्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या गीतासाठी फार पसंत केले गेले. या गीतात बालमुरली कृष्णन आणि लता मंगेशकर यांनी साथ दिली. त्यांचे हे गीत देशाच्या प्रत्येक मनात भिडले आहे. आजही हे गाणे फार लोकप्रिय व देशभक्ती भरलेलं आहे. 


    संदर्भ

    https://www.mymahanagar.com/featured/meghashyam-pundalik-rege/242090/

    https://www.majhimarathi.com/pandit-bhimsen-joshi-biography-marathi/

    https://marathivishwakosh.org/9572/


  • 23 Jan 2022 1:18 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म. 

    Nitesh Rane: Sindhudurg Airport Should Be Renamed As Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Airport Says Nitesh Rane - Nitesh Rane: नारायण राणेंचा 'हा' ड्रीम प्रोजेक्ट; याला बाळासाहेब ठाकरेंचे नाव ...महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, आपल्या भाषणांतून त्यांनी जनतेला प्रभावित केलं होतं, आणि आपला मराठी बाणा कायम ठेवला होता, राज्यात कोणतेही मोठे पद न भूषवता सर्व कारभार ज्यांच्या आदेशावरून चालायचा असे सर्व महाराष्ट्राचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व हे प्रखर होते, त्यांचा स्वभाव आपल्या माणसांची आपुलकी, त्यांच्याविषयीच प्रेम शब्दात मांडणे कठीणच, त्यांनी शिवशेना पक्षाची स्थापना करून मराठी माणसाला एकवटण्याचे कार्य महाराष्ट्रात पार पाडलं.

    ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले.  बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती.

    ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र आहे, झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती. ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.

    १९१९: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन. 

    राम गणेश गडकरी – मराठी नाटक | Natakwalaगडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या 'रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत

    कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते. नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

    १९९२: भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.

    धुंडा महाराज देगलूरकर (Dhunda Maharaj Deglurkar) – मराठी विश्वकोशधुंडामहाराज यांचा जन्म ह.भ.प. गुंडामहाराज देगलूरकर यांच्या संत घराण्यात इ.स. १९०४ (वैशाख शु. ३, शके १८२६) मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव ‘धुंडीराज’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे मनूबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथे झाले. धुंडामहाराज लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांतच आईचेही निधन झाले. माता-पित्यांचे छत्र हरपल्यावर त्यांचे काका, थोर संत ह.भ.प. महिपती महाराज यांनी धुंडामहाराज यांचे पंढरपूर येथे पुत्रवत संगोपन केले.पंढरपूरच्या मठात महिपती महाराज देगलूरकर यांना भेटण्यास ह.भ.प. विष्णुपंत जोग महाराज आले असता छोट्याशा धुंडीराजची हुशारी पाहून ‘‘याला इंग्रजी शिक्षण न देता वारकरी सांप्रदायिक शिक्षणाचे, संस्कृत, मराठी संतसाहित्याचे धडे द्या,’’ असे सुचवून गेले. 

    अहोरात्र संत-साहित्याचे अध्ययन, चिंतन आणि संस्कृत ग्रंथांचे परिशीलन, तसेच पारंपरिक भजन यांचा ध्यास घेतलेली काही वर्षे गेली आणि वयाच्या विसाव्या वर्षी धुंडामहाराजांनी ज्ञानेश्वरीवर पहिले प्रवचन करून आपल्या ज्ञानेश्वरी सेवेचा श्रीगणेशा केला. आषाढ, शके १८४६ (इ.स. १९२४) मध्ये प्रारंभ झालेला हा ज्ञानेश्वरी सेवेचा वाग्यज्ञ पुढे अखंड, धुंडामहाराजांच्या निर्वाणापर्यंत शके १९१३ (इ.स. १९९२) पर्यंत सलग ६५ वर्षे सुरू होता.


    संदर्भ

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80

    https://maharashtranayak.in/daegalauurakara-dhaundairaaja-raamacandara


  • 22 Jan 2022 9:11 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.

    स्वामी रामानंद तीर्थमराठवाड्याचे मुक्तिदाते अशी त्यांची ओळख आहे. पण ते केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर ते पूर्ण हैदराबाद संस्थानचे मुक्तिदाते होते. त्यांनी हैदराबाद संस्थान केवळ निजामाच्या जाचातून मुक्तच केलं नाही तर नव्या राज्याची दिशा कशी असावी हे देखील त्यांनी दाखवून दिलं होतं.त्यांनी अनेक नेते घडवले. गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, आ. कृ. वाघमारे, अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू या नेत्यांचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. इतकंच नव्हे तर भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे देखील त्यांचेच शिष्य होते.3 ऑक्टोबर १९०३ ला विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे भवानराव खेडगीकर यांच्या घरात व्यंकटेशचा जन्म झाला. पुढे संन्यास घेतल्यावर त्यांचं नाव स्वामी रामानंद तीर्थ झालं. सोलापूर, अंमळनेर आणि पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी समाजासाठी काही करायचं ठरवलं. त्यातूनच ते कामगार नेते ना. म. जोशी यांचे खासगी सचिव बनले

    निजामाच्या काळात उर्दू शाळांव्यतिरिक्त इतर शाळाचालकांना जाचही असे. अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वामीजींनी अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालय ही शाळा चालवली.स्वामीजींना मराठी, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या पाच भाषा येत. त्यामुळे त्या-त्या प्रांतातील व्यक्तीला ते आपल्या पैकीच वाटत.

    ७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी हैदराबादमध्ये भारतीय एकता दिवस साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पंडित नेहरूंनी दिलेला ध्वज स्वामीजींनी फडकावला.

    निजामाने त्यांना त्याच दिवशी तुरुंगात टाकलं. भारत सरकारने निजामासोबत 'जैसे थे करार' केला. स्वामीजींनी या कराराचा निषेध केला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागात दौरे केले. सर्व दौरे आटोपल्यावर ते २६ जानेवारी १९४८ला संस्थानात आले. त्यांना त्याच वेळी अटक करण्यात आली.

    १३ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य संस्थानात आलं आणि १७ सप्टेंबर रोजी निजामाच्या सैन्यानं, रझाकारांनी त्यांच्यासमोर नांगी टाकली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान मुक्त झालं. त्यानंतर स्वामीजींना सोडण्यात आलं.

    हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात यावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले.

    वय वाढू लागलं होतं प्रवासाचा ताण असह्य होऊ लागला त्यामुळे त्यांनी स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं. १९७१ मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीच नाही. त्यांना अंबाजोगाई येथून हलवण्यात आलं आणि हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. २२ जानेवारी १९७२ ला त्यांचं निधन झालं.

    १९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. 

    डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे |डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची खरी ओळख काय? प्रखर क्रांतिकारक की बुद्धिमान कृषिशास्त्रज्ञ? खरं पाहिलं तर दोन्ही ओळखी योग्यच ठरतात.

    पांडुरंग यांचे आजोबाही 1857च्या सशस्त्र क्रांतीमध्ये सामील झाले होते. हीच त्यांच्या क्रांतिकारक आयुष्याची पायाभरणी असावी. त्याच्या माध्यमिक शाळेतील शिक्षणाबरोबरच त्याने देशभक्तीचे धडे गिरवले. थोडा मोठा झाल्यावर ‘बांधव समाज’ या देशभक्तांच्या संघटनेने लोकजागृतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळात त्यांनी शेतकर्‍यांचे मेळावे घेतले. क्रांतीसाठी सैनिकी शिक्षणाप्रमाणेच आपण शेतीशास्त्रही शिकलं पाहिजे असा महत्त्वाचा विचार त्यांच्या मनावर कायमचा ठसला.

     लोकमान्य टिळक आणि देशातील इतर जहाल क्रांतिकारक, त्याचप्रमाणे जगभर विखुरलेले क्रांतिकारक यांच्याशी त्यांचा सतत संबंध आला आणि क्रांतिकारक जीवनासाठी सैनिकी शिक्षणही घेण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला. जगभरच्या भटकंतीमुळे अनेक लोकांशी त्यांचा परिचय झाला. अनेक भाषांची ओळख झाली.1911मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या आरेगॉन येथील अ‍ॅग्रिकल्चरल कॉलेजातून त्यांनी कृषिशास्त्राची बी.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी ते पंचवीस वर्षांचे होते. या पदवीमुळे त्यांना वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात नोकरी मिळाली. तेथूनच 1913मध्ये त्यांनी पुढची एम.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी त्यांनी शेतावर काम करून आपली आर्थिक गरज भागवली. हा पदवी अभ्यास करताना सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी त्यांचा खूप जवळून संबंध आला. त्यामुळे शेतकरी समाजाला उपयुक्त अशा कृषिकार्याचं महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं. म्हणून पुढचं शेतीविषयक शिक्षण त्यांनी चालूच ठेवलं. मिनेसोटा विद्यापीठातून 1914 साली त्यांना डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळाली. या पीएच.डी. पदवीसाठी त्यांनी 

    त्यांनी गव्हावर प्रयोग करून गव्हाचे विविध वाण विकसित केले. मका हे मेक्सिकोचे महत्त्वाचे पीक. त्यांनी मक्याचे उत्पादन व दर्जा यात क्रांतिकारक सुधारणा केल्या. टिओसिंटे या जंगली वनस्पतीबरोबर मक्याचा संकर करून त्यांनी एकाच ताटाला अनेक कणसे लागणारी नवीन जात शोधली. त्यांनी शेवग्याच्याही नवीन जाती शोधून काढल्या. शेवग्याच्या बीपासून सुगंधी द्रव्य निर्माण केले.१९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गदर पक्ष स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी  भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले.    

    १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री रा.कृ. पाटील यांनी मध्य प्रदेशात शेतीसुधारणा करण्यासंबंधात खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आपला अहवाल दिला. विविध प्रकारच्या २९ सूचना दिल्या. शेेतीचे यांत्रिकीकरण, शेतकी शाळांची निर्मिती, प्राथमिक कृषिशास्त्राचे शिक्षण, मजुरांचे वेतन, पडीक जमिनी सरकारने ताब्यात घेणे व त्यावर सामूहिक शेतीचे प्रयोग करणे इत्यादी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सूचना त्यात होत्या. नागपूर विद्यापीठात त्यांना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून नोकरी मिळाली. संत्रा उत्पादकाच्या सहकारी संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

    सन १९६१मध्ये खानखोजेंना भारतीय नागरिकत्व मिळाले. नागपूरमध्ये घरासाठी भूखंड मिळाला. त्यांना  १९६३मध्ये स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता व निवृत्ती वेतन मिळू लागले. वार्धक्यामुळे जीवन जगणे कठीण होऊ लागले होते, पण ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या आयुष्यातील शेेवटच्या दिवशीही कृषी विभागाच्या रौप्य महोत्सवात ते सहभागी झाले होते.


    संदर्भ

    https://www.bbc.com/marathi/india-46933203

    https://www.evivek.com/Encyc/2021/9/27/Revolutionary-and-agricultural-researcherDr-Pandurang-Khankhoje.html

    https://maharashtranayak.in/khaanakhaojae-paandauranga-sadaasaiva


  • 21 Jan 2022 6:08 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. 

    प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई। बोलावू तुज आता, मी कोणत्या उपायी।’ अशा शब्दांत आईची थोरवी गाणा-या कवी माधव ज्युलियन ऊर्फ माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा आज जन्मदिन दि. २१ जानेवारी १८९४ रोजी त्यांचा जन्म झाला. ‘रविकिरण’ मंडळातील ते एक प्रमुख कवी. बडोद्यास बालपण व्यतीत केलेल्या माधवरावांनी एम. ए. झाल्यानंतर पुणे व कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले.इंग्रजी, मराठी, संस्कृत, फारसी आणि गुजराथी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. फारसी-मराठी कोशही त्यांनी तयार केला आहे.‘विरहतरंग’ हे एक दीर्घकाव्य, तर ‘छंदोरचना’ ही त्यांची छंदशास्त्रावरची सर्वात महत्त्वाची प्रबंध रचना आहे. या त्यांच्या प्रबंध रचनेस विश्वविद्यालयाने डी.लिट. ही अत्युच्च पदवी देऊन गौरविले. 

    १९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्य संमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते. १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा कवी माधव ज्यूलियन यांनी अध्यक्षपद भूषवले होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे.


    १९१०: गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. 

    शांताराम आठवल्यांचा जन्म २१ जानेवारी, इ.स. १९१० रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील ग्वाल्हेर संस्थानाच्या सरदार शितोळ्यांचे पुण्यातील कारभारी होते. पुण्यातल्या भावे प्रशालेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. याच शाळेत त्यांना कविवर्य माधव ज्युलियन यांच्या अध्यापनाचा लाभ घडला. पण आठवले यांची काव्यवृत्ती खरी फुलवली ती प्रा. वा. भा. पाठक यांनी. मराठीसोबतच प्रा. किंकर यांनी इंग्रजी काव्याचीही त्यांना गोडी लावली. त्यांनीच शांताराम आठवले यांच्या कविता प्रथम प्रकाशात आणल्या. शांताराम आठवलेंना आपटे यांच्या शिफारसीमुळे अमृतमंथन या बोलपटाचे गीतलेखानाचे काम मिळाले. अशा रीतीने शांताराम आठवले प्रभातमध्ये सहाय्यक म्हणून १ जानेवारी १९३५ पासून नोकरीस रुजू झाले. 

    आठवले, शांताराम गोविंद | महाराष्ट्र नायकत्यांनी लिहिलेली ‘अहा भारत विराजे’, ‘भारती सृष्टीचे सौंदर्य’, ‘उसळत तेज भरे’, ‘हासत वसंत ये वनी’, ‘राधिका चतुर बोले’, ‘लखलख चंदेरी’, ‘दोन घडीचा डाव’ ही सारी गीते प्रासादिक, नादमधुर व अर्थपूर्ण होती. प्रभातमध्ये आठवले १९३४ ते १९४३ अशी नऊ वर्षे होते. नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. शांतारामबापूंबरोबर काम करताना त्यांनी दिग्दर्शनातील बारकावे व वैशिष्ट्ये आत्मसात केली.  आठवले यांनी १९४८ साली ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘मै अबला नहीं’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘संसार करायचाय मला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘पडदा’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले.

    १९५९ मध्ये भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तिथे त्यांनी अनेक अनुबोधपटांचे दिग्दर्शन केले.     ‘एकले बीज’ व ‘बीजांकुर’ हे काव्यसंग्रह व ‘प्रभातकाल’ हे ‘प्रभात’मध्ये असतानाच्या काळात लिहिलेले त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. त्यांना १९६५ सालच्या ‘वावटळ’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांचा ‘ज्ञानेश्वरी’चा व ‘ज्योतिषशास्त्रा’चा अभ्यास दांडगा होता. 


    संदर्भ

    https://prahaar.in/madhav-trambak-patvardhan/

    https://maharashtranayak.in/athavalae-saantaaraama-gaovainda

  • 20 Jan 2022 5:49 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबरी कार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म

    कानिटकर, काशीबाई गोविंदराव | महाराष्ट्र नायक

    कृष्णराव बापट या वकिलाच्या घरात काशीबाईंचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न गोविंदराव कानिटकरांशी झाले. गोविंदरावांचे चुलते नारायण बापुजी कानिटकर हे कट्टर टिळकपंथीय होते. सनातन्यांच्या बाजूने सुधारकांवर टीका करण्याची संधी ते सोडत नसत. मात्र गोविंदरावांचा कल सुधारकांकडे राहिला. ‘आपल्या पत्नीने शिकायला हवे’ हा विचार ते तेव्हा बोलून दाखवत असत आणि प्रत्यक्ष लग्न झाल्यावर त्यांनी काशीबाईंना शिकवलेही. त्या काळात पति-पत्नी घरच्या वडीलधार्‍या मंडळींना न सांगता ‘प्रार्थना समाजा’च्या वा ‘मराठी ज्ञानप्रसारक सभे’च्या व्याख्यानांना जात असत. गोविंदराव कानिटकर मुन्सफ होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर काशीबाईंना सभासंमेलनांना जावे लागे. रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांच्याशी काशीबाईंचा स्नेह राहिला. रमाबाई रानडे यांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी आणि पुढे सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यासाठी उत्तेजन दिले. गोविंदरावांना इंग्रजी व मराठी साहित्यात रस होता.

         अव्वल इंग्रजीच्या काळात स्त्री-शिक्षणाची सुविधा प्राप्त झाली असली, तरी स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात शिकत होत्या असा भाग नव्हता. काशीबाईंना गोविंदरावांनी शिकवले आणि त्या काळातील एक सुशिक्षित, बुद्धिमान स्त्री आणि लेखिका म्हणून त्यांच्याकडे समाज तेव्हा व नंतरही आदराने पाहत आला आहे. १९०४ साली पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थित असलेल्या त्या एकमेव स्त्री  होत्या.

    १८९८: मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. 

    imgसंगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वाला लाभलेले एक वरदान ! गळ्यात विलक्षण फिरत असलेली घराणेदार शास्त्रीय संगीत गायकी, अनेक अनवट राग व जोड रागांचे निर्माणकर्ते, बंदिशींचे रचनाकार, मराठी संगीत रंगभूमीवरील सर्जनशील संगीतकार-गायक नट, मराठी चित्रपट संगीत विश्वातील अनेक नवीन प्रयोगांचे आद्य प्रवर्तक, देशकार्यात संगीताच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान देणारे निष्ठावान देशभक्त.. अश्या अनेक पैलूंनी समृद्ध असलेले सिद्धहस्त मास्तर कृष्णरावांचे कार्य आजही अभ्यासू गायक, कलाकार आणि गुणीजनांना मार्गदर्शक ठरणारे व आत्मिक आनंद देणारे आहे.

    यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी देवाची आळंदी येथे आजोळी सौभाग्यवती मथुराबाई फुलंब्रीकर यांच्या पोटी झाला. मास्तरांचे घराणे वेदपठण करणाऱ्या देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणांचे. मराठवाड्यातील 'फुलंब्री' हे मास्तरांच्या घराण्याचे मूळ गाव असून वेदपठण करणारे याअर्थी 'पाठक' हे मूळ आडनाव होते. नानासाहेब पेशवे सरकारांनी त्या वेदज्ञानी पूर्वजाचा यथोचित आदरसत्कार करून त्यास 'आजपासून आपण फुलंब्रीकर म्हणून ओळखले जाल," अशा शब्दांत गौरविले. या घटनेमुळे मास्तरांच्या घराण्याचे मूळ आडनाव जे पाठक होते ते बदलून 'फुलंब्रीकर' असे झाले

    "नाट्यकला प्रवर्तक" या मराठी संगीत नाट्यसंस्थेत बाल गायकनट म्हणून भूमिका करण्याची संधी मिळाली. तिथे मास्तरांना नाट्यपदांकरिता सवाई गंधर्व आणि उस्ताद निसार हुसेन खान यांचे संगीत मार्गदर्शन लाभले.

    एकदा नाटयकला प्रवर्तक संस्थेचे संगीत नाटक बघायला "पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर" आणि "गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले" एकत्र आले होते. त्यावेळेस कृष्णाच्या गाण्यातील गोडवा, कल्पकता आणि चतुराई बखलेबुवांनी हेरली. कृष्णा जेव्हा त्या दोन थोर कलावंतांच्या पाया पडला तेव्हा बखलेबुवांनी, "हा मुलगा नीट गाणे शिकल्यास पुढे मोठा गवई होईल," असे कौतुकाने उद्गार काढले. योगायोगाने त्याच सुमारास म्हणजे १९११ साली गंडाबंधन होऊन मास्तरांचे शास्त्रीय गाण्याचे शिक्षण बखलेबुवांकडे सुरू झाले.

    गुरुवर्य भास्करबुवांकडे गाणे शिकण्यास आरंभ केल्यानंतर थोड्याच अवधीत बुवांनी लहान वयातील कृष्णाला स्वतंत्र मैफल सादर करण्यात तयार केले. बुवांनी कृष्णाची पहिली जाहीर मैफल सन १९११ मध्ये म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी महाराष्ट्रातील धुळे येथील कमिन्स क्लबमध्ये आयोजित केली. त्यावेळी कृष्णाने मैफलीत तयारीने अप्रतिम गायन सादर केले आणि सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली. पितृतुल्य असलेल्या गुरुवर्य बखलेबुवांनी प्रेमाने शिष्याची पाठ थोपटून आशीर्वाद दिला. धुळे येथील मैफल गाजवल्यानंतर लगेचच कृष्णाचा पुणे येथील किर्लोस्कर थिएटरमध्ये जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. साहित्यसम्राट न. चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर यांनी त्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यावेळी साहित्यसम्राट केळकर यांनी बालगायक कृष्णाला सुवर्ण पदक बहाल करून कौतुकाने 'मास्टर कृष्णा' अशी उपाधी दिली. तेव्हापासून कृष्णाचा उल्लेख सर्वत्र मास्टर कृष्णा असा होऊ लागला

    संदर्भ

    https://maharashtranayak.in/kaanaitakara-kaasaibaai-gaovaindaraava

    https://masterkrishnarao.com/


  • 4 Aug 2021 5:38 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १८९४:

    तंत्रशुद्धता, रेखीवपणा आणि डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेले कथालेखन केलेले ना. सी. फडके यांचा जन्मदिवस. त्यावेळच्या पूना कॉलेजात (आजचे स. प. महाविद्यालय), त्यानंतर दिल्ली, सिंध हैदराबाद, नागपूर, कोल्हापूर येथील महाविद्यालयांतून तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मानसशास्त्र ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून १९४९ मध्ये ते निवृत्त झाले. रत्नागिरी येथे झालेल्या १९४० सालच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. १९६२ साली भारत सरकारने 'पद्मभूषण' किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांनी काही चरित्रग्रंथांमधून चरित्रनायक आणि त्यांच्या कृती ह्यांचे रहस्योद्ग्राही विवेचन केले आहे. काही थोरांची चरित्रे त्यांनी खास विध्यार्थ्यांकरताही लिहिली.

    संदर्भ

    https://www.marathisrushti.com/articles/autograph-of-dfamous-marathi-author-na-si-phadke/

    https://vishwakosh.marathi.gov.in/27520/


  • 30 Jul 2021 5:39 AM | Anonymous

    शास्त्रीय गायनात आवर्जून घेतले जाणारे नाव, प्रसिद्ध गायक, कलाकार वसंतराव देशपांडे यांना लहान पणापासून कलेची आवड होती. सातव्या वर्षापासूनच दिग्गजांकडून संगीताचे धडे त्यांना मिळाले. सुरवातीस २४ वर्षे नोकरीबरोबरच संगीताचीही उपासना त्यांनी चालू ठेवली. त्यानंतर पूर्णपणे संगीताला  वाहून घेतले. ते उत्तम खास शैली असणारे शास्त्रीय संगीत गायक तर होतेच. त्याबरोबरच कट्यार काळजात घुसली मधले खांसाहेब विशेष लक्षात राहिले. ८० हुन जास्त चित्रपटांसाठी पाश्वगायन आणि काही चित्रपट भूमिकाही केल्या. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षही होते.

    १९८३ साली त्यांचे ३० जुलै रोजी निधन झाले. 

    संदर्भ

    https://www.marathisrushti.com/profiles/dr-vasantrao-deshpande/

    https://www.dainikprabhat.com/dr-vasantrao-deshpande/



  • 29 Jul 2021 6:02 AM | Anonymous

    १९२२: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म

    संदर्भ

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87

    २००२: गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे निधन

    संदर्भ

    https://marathivishwakosh.org/7497/


  • 6 Jul 2021 6:08 AM | Amol Sawarkar (Administrator)

    आज जुन्या हस्तलिखितांचा, जुन्या ग्रंथांचा अभ्यास करायचा असेल तर पुण्यातील एक संस्था म्हणून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे एकाच नाव पुढे येतं.

    संस्कृत आणि भारतविद्यचे महर्षी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्याविषयी यथार्थ आदर प्रकट करण्याच्या हेतूने, त्यांचे शिष्य आणि मित्र यांनी ६ जुलै १९१७ मध्ये, भांडरकरांच्या ८० व्या वाढदिवशी, ह्या संस्थेची स्थापना केली. पोथ्या भूर्जपत्र. ताडपत्र, वंशपत्र, जुना कागद यांवर असलेल्या हस्तलिखितांचा संग्रह २४,००० च्या वर असून एकंदर ग्रंथसंख्या ६०,००० च्या आसपास असावी.

    अध्ययन- संशोधनासाठी भारताच्या कोनाकोपऱ्यांतून आणि जगातील अनेक देशांतून अभ्यासक येथे येतात. संस्थेच्या अतिथिगृहात निवासाची व ग्रंथालयात अध्ययनाची सुविधा आहे. संस्थेचे संचालक पुणे विद्यापीठाच्या स्नातकोत्तर अध्यापनात आणि संशोधन-मार्ग-दर्शनात सहभागी असतात.

    संदर्भ:

    https://vishwakosh.marathi.gov.in/30016/

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0


  • 5 Jul 2021 7:38 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १२०० रहस्यकथा लिहिणारा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालीय असा अफलातून लेखक भारतात आणि तोही मराठी ?


    रहस्यकथा खूप जण लिहितात. इंग्रजी भाषेत लिहिणारे ते वाचता येणाऱ्यानाच माहित असणार. मात्र, हे साहित्य मराठीत आणण्याचं १०० टक्के कठीण काम यशस्वी करणारे एकमेव लेखक म्हणजे बाबूराव अर्नाळकर. ‘चंद्रकांत सखाराम चव्हाण’! आईबापाचं छत्र अगदी लहानपणीच हरवल्यामुळं स्वारीला मुंबईच्या मावशीकडे आश्रय घ्यावा लागला होता. शिक्षण आणि नोकरीही मुंबईतच. तिथेच त्यांचं चष्म्याचं दुकान होतं. फावल्या वेळात रहस्यकथा लिहिण्याचं जबरदस्त वेड लागलं आणि त्यानंतर मागे वाळूनच बघितलं नाही. धनंजयमाला, झुंजारमाला, जयहिंदमाला, प्रफुल्लमाला अशा माला सुरू करून त्यातून दरमहा पाच-सहा कथा लिहिल्या.  १४८० रहस्यकथा लिहिल्याने गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये अत्यंत सन्मानाने नोंद झालेले पहिले मराठी साहित्यिक.  त्यांच्या वाचकांची दुनिया अमर्यादपणे महाराष्ट्रभर पसरलेली आहे. 

    Baburao Books

    अशा या रहस्यकथाकाराचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले.

    संदर्भ :

    http://samirparanjape.blogspot.com/2017/01/baburao-arnalkar.html

    http://prahaar.in/%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85/