Log in


इतिहासात ६ जुलै रोजी

6 Jul 2021 6:08 AM | Amol Sawarkar (Administrator)

आज जुन्या हस्तलिखितांचा, जुन्या ग्रंथांचा अभ्यास करायचा असेल तर पुण्यातील एक संस्था म्हणून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे एकाच नाव पुढे येतं.

संस्कृत आणि भारतविद्यचे महर्षी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्याविषयी यथार्थ आदर प्रकट करण्याच्या हेतूने, त्यांचे शिष्य आणि मित्र यांनी ६ जुलै १९१७ मध्ये, भांडरकरांच्या ८० व्या वाढदिवशी, ह्या संस्थेची स्थापना केली. पोथ्या भूर्जपत्र. ताडपत्र, वंशपत्र, जुना कागद यांवर असलेल्या हस्तलिखितांचा संग्रह २४,००० च्या वर असून एकंदर ग्रंथसंख्या ६०,००० च्या आसपास असावी.

अध्ययन- संशोधनासाठी भारताच्या कोनाकोपऱ्यांतून आणि जगातील अनेक देशांतून अभ्यासक येथे येतात. संस्थेच्या अतिथिगृहात निवासाची व ग्रंथालयात अध्ययनाची सुविधा आहे. संस्थेचे संचालक पुणे विद्यापीठाच्या स्नातकोत्तर अध्यापनात आणि संशोधन-मार्ग-दर्शनात सहभागी असतात.

संदर्भ:

https://vishwakosh.marathi.gov.in/30016/

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0