Menu
Log in


Log in


इतिहासात २२ जानेवारी

22 Jan 2022 9:11 AM | Amol Sawarkar (Administrator)

१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.

स्वामी रामानंद तीर्थमराठवाड्याचे मुक्तिदाते अशी त्यांची ओळख आहे. पण ते केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर ते पूर्ण हैदराबाद संस्थानचे मुक्तिदाते होते. त्यांनी हैदराबाद संस्थान केवळ निजामाच्या जाचातून मुक्तच केलं नाही तर नव्या राज्याची दिशा कशी असावी हे देखील त्यांनी दाखवून दिलं होतं.त्यांनी अनेक नेते घडवले. गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, आ. कृ. वाघमारे, अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू या नेत्यांचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. इतकंच नव्हे तर भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे देखील त्यांचेच शिष्य होते.3 ऑक्टोबर १९०३ ला विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे भवानराव खेडगीकर यांच्या घरात व्यंकटेशचा जन्म झाला. पुढे संन्यास घेतल्यावर त्यांचं नाव स्वामी रामानंद तीर्थ झालं. सोलापूर, अंमळनेर आणि पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी समाजासाठी काही करायचं ठरवलं. त्यातूनच ते कामगार नेते ना. म. जोशी यांचे खासगी सचिव बनले

निजामाच्या काळात उर्दू शाळांव्यतिरिक्त इतर शाळाचालकांना जाचही असे. अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वामीजींनी अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालय ही शाळा चालवली.स्वामीजींना मराठी, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या पाच भाषा येत. त्यामुळे त्या-त्या प्रांतातील व्यक्तीला ते आपल्या पैकीच वाटत.

७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी हैदराबादमध्ये भारतीय एकता दिवस साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पंडित नेहरूंनी दिलेला ध्वज स्वामीजींनी फडकावला.

निजामाने त्यांना त्याच दिवशी तुरुंगात टाकलं. भारत सरकारने निजामासोबत 'जैसे थे करार' केला. स्वामीजींनी या कराराचा निषेध केला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागात दौरे केले. सर्व दौरे आटोपल्यावर ते २६ जानेवारी १९४८ला संस्थानात आले. त्यांना त्याच वेळी अटक करण्यात आली.

१३ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्य संस्थानात आलं आणि १७ सप्टेंबर रोजी निजामाच्या सैन्यानं, रझाकारांनी त्यांच्यासमोर नांगी टाकली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान मुक्त झालं. त्यानंतर स्वामीजींना सोडण्यात आलं.

हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात यावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले.

वय वाढू लागलं होतं प्रवासाचा ताण असह्य होऊ लागला त्यामुळे त्यांनी स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं. १९७१ मध्ये ते आजारी पडले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीच नाही. त्यांना अंबाजोगाई येथून हलवण्यात आलं आणि हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. २२ जानेवारी १९७२ ला त्यांचं निधन झालं.

१९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. 

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे |डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची खरी ओळख काय? प्रखर क्रांतिकारक की बुद्धिमान कृषिशास्त्रज्ञ? खरं पाहिलं तर दोन्ही ओळखी योग्यच ठरतात.

पांडुरंग यांचे आजोबाही 1857च्या सशस्त्र क्रांतीमध्ये सामील झाले होते. हीच त्यांच्या क्रांतिकारक आयुष्याची पायाभरणी असावी. त्याच्या माध्यमिक शाळेतील शिक्षणाबरोबरच त्याने देशभक्तीचे धडे गिरवले. थोडा मोठा झाल्यावर ‘बांधव समाज’ या देशभक्तांच्या संघटनेने लोकजागृतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळात त्यांनी शेतकर्‍यांचे मेळावे घेतले. क्रांतीसाठी सैनिकी शिक्षणाप्रमाणेच आपण शेतीशास्त्रही शिकलं पाहिजे असा महत्त्वाचा विचार त्यांच्या मनावर कायमचा ठसला.

 लोकमान्य टिळक आणि देशातील इतर जहाल क्रांतिकारक, त्याचप्रमाणे जगभर विखुरलेले क्रांतिकारक यांच्याशी त्यांचा सतत संबंध आला आणि क्रांतिकारक जीवनासाठी सैनिकी शिक्षणही घेण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला. जगभरच्या भटकंतीमुळे अनेक लोकांशी त्यांचा परिचय झाला. अनेक भाषांची ओळख झाली.1911मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या आरेगॉन येथील अ‍ॅग्रिकल्चरल कॉलेजातून त्यांनी कृषिशास्त्राची बी.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी ते पंचवीस वर्षांचे होते. या पदवीमुळे त्यांना वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात नोकरी मिळाली. तेथूनच 1913मध्ये त्यांनी पुढची एम.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी त्यांनी शेतावर काम करून आपली आर्थिक गरज भागवली. हा पदवी अभ्यास करताना सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी त्यांचा खूप जवळून संबंध आला. त्यामुळे शेतकरी समाजाला उपयुक्त अशा कृषिकार्याचं महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं. म्हणून पुढचं शेतीविषयक शिक्षण त्यांनी चालूच ठेवलं. मिनेसोटा विद्यापीठातून 1914 साली त्यांना डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळाली. या पीएच.डी. पदवीसाठी त्यांनी 

त्यांनी गव्हावर प्रयोग करून गव्हाचे विविध वाण विकसित केले. मका हे मेक्सिकोचे महत्त्वाचे पीक. त्यांनी मक्याचे उत्पादन व दर्जा यात क्रांतिकारक सुधारणा केल्या. टिओसिंटे या जंगली वनस्पतीबरोबर मक्याचा संकर करून त्यांनी एकाच ताटाला अनेक कणसे लागणारी नवीन जात शोधली. त्यांनी शेवग्याच्याही नवीन जाती शोधून काढल्या. शेवग्याच्या बीपासून सुगंधी द्रव्य निर्माण केले.१९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गदर पक्ष स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी  भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले.    

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री रा.कृ. पाटील यांनी मध्य प्रदेशात शेतीसुधारणा करण्यासंबंधात खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आपला अहवाल दिला. विविध प्रकारच्या २९ सूचना दिल्या. शेेतीचे यांत्रिकीकरण, शेतकी शाळांची निर्मिती, प्राथमिक कृषिशास्त्राचे शिक्षण, मजुरांचे वेतन, पडीक जमिनी सरकारने ताब्यात घेणे व त्यावर सामूहिक शेतीचे प्रयोग करणे इत्यादी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सूचना त्यात होत्या. नागपूर विद्यापीठात त्यांना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून नोकरी मिळाली. संत्रा उत्पादकाच्या सहकारी संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

सन १९६१मध्ये खानखोजेंना भारतीय नागरिकत्व मिळाले. नागपूरमध्ये घरासाठी भूखंड मिळाला. त्यांना  १९६३मध्ये स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता व निवृत्ती वेतन मिळू लागले. वार्धक्यामुळे जीवन जगणे कठीण होऊ लागले होते, पण ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या आयुष्यातील शेेवटच्या दिवशीही कृषी विभागाच्या रौप्य महोत्सवात ते सहभागी झाले होते.


संदर्भ

https://www.bbc.com/marathi/india-46933203

https://www.evivek.com/Encyc/2021/9/27/Revolutionary-and-agricultural-researcherDr-Pandurang-Khankhoje.html

https://maharashtranayak.in/khaanakhaojae-paandauranga-sadaasaiva