Menu
Log in


Log in


इतिहासात २१ जानेवारी

21 Jan 2022 6:08 AM | Amol Sawarkar (Administrator)

१८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. 

प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई। बोलावू तुज आता, मी कोणत्या उपायी।’ अशा शब्दांत आईची थोरवी गाणा-या कवी माधव ज्युलियन ऊर्फ माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा आज जन्मदिन दि. २१ जानेवारी १८९४ रोजी त्यांचा जन्म झाला. ‘रविकिरण’ मंडळातील ते एक प्रमुख कवी. बडोद्यास बालपण व्यतीत केलेल्या माधवरावांनी एम. ए. झाल्यानंतर पुणे व कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले.इंग्रजी, मराठी, संस्कृत, फारसी आणि गुजराथी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. फारसी-मराठी कोशही त्यांनी तयार केला आहे.‘विरहतरंग’ हे एक दीर्घकाव्य, तर ‘छंदोरचना’ ही त्यांची छंदशास्त्रावरची सर्वात महत्त्वाची प्रबंध रचना आहे. या त्यांच्या प्रबंध रचनेस विश्वविद्यालयाने डी.लिट. ही अत्युच्च पदवी देऊन गौरविले. 

१९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्य संमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते. १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा कवी माधव ज्यूलियन यांनी अध्यक्षपद भूषवले होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे.


१९१०: गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. 

शांताराम आठवल्यांचा जन्म २१ जानेवारी, इ.स. १९१० रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील ग्वाल्हेर संस्थानाच्या सरदार शितोळ्यांचे पुण्यातील कारभारी होते. पुण्यातल्या भावे प्रशालेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. याच शाळेत त्यांना कविवर्य माधव ज्युलियन यांच्या अध्यापनाचा लाभ घडला. पण आठवले यांची काव्यवृत्ती खरी फुलवली ती प्रा. वा. भा. पाठक यांनी. मराठीसोबतच प्रा. किंकर यांनी इंग्रजी काव्याचीही त्यांना गोडी लावली. त्यांनीच शांताराम आठवले यांच्या कविता प्रथम प्रकाशात आणल्या. शांताराम आठवलेंना आपटे यांच्या शिफारसीमुळे अमृतमंथन या बोलपटाचे गीतलेखानाचे काम मिळाले. अशा रीतीने शांताराम आठवले प्रभातमध्ये सहाय्यक म्हणून १ जानेवारी १९३५ पासून नोकरीस रुजू झाले. 

आठवले, शांताराम गोविंद | महाराष्ट्र नायकत्यांनी लिहिलेली ‘अहा भारत विराजे’, ‘भारती सृष्टीचे सौंदर्य’, ‘उसळत तेज भरे’, ‘हासत वसंत ये वनी’, ‘राधिका चतुर बोले’, ‘लखलख चंदेरी’, ‘दोन घडीचा डाव’ ही सारी गीते प्रासादिक, नादमधुर व अर्थपूर्ण होती. प्रभातमध्ये आठवले १९३४ ते १९४३ अशी नऊ वर्षे होते. नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. शांतारामबापूंबरोबर काम करताना त्यांनी दिग्दर्शनातील बारकावे व वैशिष्ट्ये आत्मसात केली.  आठवले यांनी १९४८ साली ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘मै अबला नहीं’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘संसार करायचाय मला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘पडदा’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले.

१९५९ मध्ये भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तिथे त्यांनी अनेक अनुबोधपटांचे दिग्दर्शन केले.     ‘एकले बीज’ व ‘बीजांकुर’ हे काव्यसंग्रह व ‘प्रभातकाल’ हे ‘प्रभात’मध्ये असतानाच्या काळात लिहिलेले त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. त्यांना १९६५ सालच्या ‘वावटळ’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांचा ‘ज्ञानेश्वरी’चा व ‘ज्योतिषशास्त्रा’चा अभ्यास दांडगा होता. 


संदर्भ

https://prahaar.in/madhav-trambak-patvardhan/

https://maharashtranayak.in/athavalae-saantaaraama-gaovainda