Menu
Log in


Log in


This section of articles is to collect the information referring to the history we should be proud about. The content will beadded with reference to the source and the contributing person name keep the credits. Note that following the organisational non-political stand, articles relating to politics may be avoided.

<< First  < Prev   1   2   3   4   5   ...   Next >  Last >> 
  • 11 Mar 2022 11:37 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
    Sangeet Manapman By Krushnaji Prabhakar Khandilkar१२ मार्च १९११. ‘मानापमान’चा पहिला प्रयोग जाहीर झाला आणि दुसऱ्याच दिवशी सर्व तिकिटं संपली. काकासाहेब अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचं पहिलं संगीत नाटक आणि बालगंधर्वांची भूमिका हा ‘किर्लोस्कर मंडळी’नं साधलेला अपूर्व संयोग होता. नाटकाची जय्यत तयारी झाली होती.

    काकासाहेबांच्या कडक शिस्तीत अभिनय आणि गाण्याच्या तालमी उत्तम झाल्या होत्या. नाटक सादर होणार होतं मुंबईत. कंपनीच्या बिऱ्हाडी पाहुण्यांची गर्दी झाली होती. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उत्साहाला उधाण आलं होतं. १२ तारीख उजाडण्याची प्रत्येक जण वाट पहात होता; पण अकरा तारखेच्या रात्री बालगंधर्वांची एकुलती एक चिमुकली मुलगी आजारी पडली. इतकी आजारी, की त्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला. दु:खद निधनवार्ता ऐकून सर्वत्र शोककळा पसरली. 

    बारा तारखेला नाटकाचा प्रयोग करण्याऐवजी पुढचा दिवस ठरवावा असा विचार कंपनीनं केला. कंपनीच्या नटांची आणि पाहुण्यांची घोर निराशा झाली. प्रेक्षकांचीही घोर निराशा होणार; पण इलाज नव्हता. नारायणरावांना अर्थात बालगंधर्वांना हे सागितलं, की नाटक पुढं ढकलायचं. त्या वेळी त्यांनी निक्षून सांगितलं, की ‘झालं ते झालं, नाटक रद्द करू नका.’ आपलं दु:ख काळजाच्या कुपीत बंद करून रसिकांसाठी आनंदाची कुपी उघडी करायची असं बालगंधर्वांनी ठरवलं. काळजातलं दु:ख काळजातच लपवलं आणि नाटकाचा प्रयोग सादर झाला.

    १९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.

    जेष्ठ मराठी लेखिका कविता नरवणे हे एक भारावून टाकणारे व्यक्तिमत्व होते. कविता विश्वनाथ नरवणे या पूर्वाश्रमींच्या योगिनी वासुदेव तोफखाने. त्यांचे पदव्युत्तर शिक्षणही कोल्हापूर येथेच झाले. 

    प्रसिद्ध लेखिका व आवडत्या प्राध्यापिका म्हणून त्या परिचीत होत्या. त्यांनी अनेक दिवाळी अंकात लिखाण केले होते. त्याचे अनेक कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले होते. ओघवती भाषा आणि सुरेख विश्लेषण ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापिकेची भूमिका निभावत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले व १९८९ मध्ये इतिहास विभाग प्रमुख म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेतली. 

    मध्ययुगीन इतिहास  मराठ्यांचा इतिहास असो वा आधुनिक जगाचा इतिहास. कविता नरवणे बाईंचा प्रत्येक तास विध्यार्थांना नवीन शिकवून जायचा. कथासंग्रह, कादंबऱ्या, नाटके अशी एकूण ३५ पुस्तके प्रकाशित करून त्यांनी पुण्यातील साहित्यिक वर्तुळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या एका कथासंग्रहाचे, 'जाने-अनजाने' या नावाने हिंदीमध्ये रुपांतर झाले आहे. 

    निवृत्तीनंतर काही सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सुधारणा घडवून आणण्यासाठी योगदान दिले. इंडियन एक्सप्रेसच्या लोकल ट्रान्सपोर्ट समिती प्रमुख म्हणून काही काळ कार्य करताना सामान्यांच्या या संदर्भातील समस्या व त्या दूर करण्यासाठी सुधारणा त्यांनी इंडियन एक्सप्रेसच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवल्या. नागरी सेवा मंच, एरंडवणा, पुणे, प्रस्थापित करून त्याची कार्याध्यक्षा म्हणून स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली. जनता सहकारी बँकेच्या संचालक म्हणूनही त्यांनी सुधारणांचा पाठपुरावा केला.

    भाषा-व्यवहार कोशाच्या निमित्ताने नरवणे यांनी फार मोठे कार्य केले, नरवणे यांच्या सोळा भाषांमधील कोशाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांनी केले होते. त्याबरोबरच सोळा भाषांमधील म्हणी आणि वाक्प्रचार यासंबंधीही त्यांनी केलेले संशोधन व लेखन महत्त्वपूर्ण होते

    १९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

    १८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

    १९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म. 

    संदर्भ 

    https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4916647597363012148&title=Balgandharv%20-%20Khara%20to%20Prema&SectionId=1002&SectionName=Be%20Positive

    https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5095970705263527289&title=Memorial%20Day%20of%20Senior%20Marathi%20Writer,%20Professor%20Kavita%20Vishwanath%20Narwane&SectionId=5263949971971216241&SectionName=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80


  • 11 Mar 2022 6:23 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

    आनंदीबाई गोपाळराव जोशी - MPSC Todayसुरूवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.

    आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते.

    पुढे गोपाळरावांची चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले.कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईनी एम.डी. ची पदवी मिळवली. एम.डी.साठी त्यांनी ‘‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’‘ या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

    १९१५: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म. 

    भारत को पहली 'विजय' दिलाने वाले थे हजारे को जन्मदिन मुबारक - happy birthday to cricketer vijay hazare - AajTakविजय हजारे यांचा जन्म मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. सांगलीतील शिक्षकाच्या आठ मुलांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता.सुरुवातीस त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. पण, त्यावेळचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डी' मेलो यांनी त्यांची समजूत काढली आणि हजारे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली.सर डॉन ब्रॅडमन सांगतात, "विजय हजारे जर कर्णधार झाले नसते तर त्यांची गणना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये केली गेली असती."विजय मर्चंट सांगतात, "कर्णधार पदाने विजय हजारेंना महान फलंदाज होऊ दिले नाही."विजय हजारे पद्मश्री किताब मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू  

    १८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

    १९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

    १६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. 

    १९७९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.१९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. 

    संदर्भ 

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87


  • 22 Feb 2022 5:59 AM | Amol Sawarkar (Administrator)

    २०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. 

    वि. स. वाळिंबे, इनिड ब्लायटनविनायक सदाशिव वाळींबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झाले तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झाले. विद्यार्थिदशेपासून त्यांचा कल पत्रकारितेकडे होता. त्याचप्रमाणे त्यांचा राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग होता. अग्रणी, ज्ञानप्रकाश, प्रभात, लोकशक्ती या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी नोकरी केली. १९६२ मध्ये ते पहिल्यांदा उपसंपादक म्हणून आणि त्यानंतर रविवार आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी केसरी मध्ये काम केले. 

    बाळींबे १९६५ साली पत्रकारितेच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. तेथील अनुभव त्यांनी सह्याद्री मासिकामध्ये लिहिले. इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि.स.वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. वाचनीयता आणि रसवत्ता जराही उणावू न देता अभ्यास आणि कष्ट यांनी निवडून, पारखून दिलेला तपशील उत्तम रीतीने मांडण्याचे कौशल्य वाळिंबे यांच्या जवळ होते.

    बाळींबे यांची बंगलोर ते रायबरेली, इंदिराजी ही पुस्तके विशेष गाजली. त्यांनी मोठ्या माणसांच्या मोठेपणाची अनेक अंगांनी उकल करण्याचा प्रयत्न केला. मानवी मर्यादांचे, दौर्बल्याचे, मोहप्रवणतेचे भान ठेवून त्यांनी जागतिक पातळीवरची महत्वाची व्यक्तिमत्त्वे लेखनविषय केली. चांगल्या जाणत्या, तयारीच्या बहुश्रुत अशा वाचकाचेही समाधान करणारी गुणवत्ता त्यांच्या लेखनात प्रकट झाली आणि ती शेवटपर्यंत अखंड टिकूनही राहिली. त्यांची इस्रायलचा वज्रप्रहार, तीन युद्धकथा, स्टॅलिनची मुलगी, पराजित अपराजित, एडविना आणि नेहरू, दुसरे महायुद्ध हिटलर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय घटनांची माहिती देणारी प्रकाशित झाली ती पुस्तके खूपच गाजली ती त्यांच्या त्रयस्थ आणि तटस्थ लेखन पद्धतीमुळे. हिटलर किंवा त्यांचे सावरकर किंवा त्यांचे नेताजी वाचताना त्यातले प्रसंगनाट्य अक्षरश: खिळवून ठेवते.

    मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या वि. स. वाळींबे यांचे २२ फेब्रुवारी २००० मध्ये निधन झाले.

    २००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. 

    डॉ. लक्ष्मण देशपांडे, जयदेव हट्टंगडीडॉ. लक्ष्मण देशपांडे एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. 

    लक्षमण देशपांडे लहानप गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्‍स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली.   २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती. त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले

    संदर्भ

    https://www.marathisrushti.com/articles/author-vi-sa-walimbe/

    https://www.marathisrushti.com/articles/dr-laxman-deshpande/



  • 19 Feb 2022 1:01 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. 

    c.ndtvimg.com/2019-02/keljkn5o_chhatrapati-shiv...रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही. महाराज समजून घ्यायला हवेत आणि ते समजण्यासाठी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे त्यातूनच तुम्ही आयुष्याची लढाई लढण्यासाठी सिद्ध होऊ शकतात.

    शिवाजी हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ते दणकट शरीर, बुद्धिमान, शौर्य व धैर्याची मूर्ती एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक. त्यांचे पुर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले. मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शिवाजी महाराज हे स्वतः धर्मनिष्ठ हिंदू राजे होते.

    अशाच महान राजाचा जन्म १९ फेब्रुवारी १९३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे “शिवाजी” असे नामकरण करण्यात आले. पहिली गुरु आई आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या सान्निध्यात आणि संस्कारात महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजींनी त्यांना युध्द कौशल्यात आणि नितिशास्रात पारंगत केले. महाराज लहानाचे मोठे शिवनेरीत येथे झाले. शिवनेरी सोबतची माहुली व पुणे येथे देखील त्यांचे बालपण गेले.

    जिजामाता सारखाच शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशासाठी असलेले प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय होते. अशा गुणांमुळे शिवाजी तयार झाले. “स्वराज्य म्हणजे स्वताचे राज्य.” महाराजांना वाटू लागले जर आपल्याला आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर त्यासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजे. ही जाणीव त्यांना लहानपणापासून होती.

    ६ जून १६७४ ला गागाभट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या अणि श्रेष्ठांच्या उपस्थितीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यांनी शिवराई हे चलन शुरू केले. धर्माच्या नावाखाली त्यांनी काहीही कुणासोबत पक्षपात केला नाही. त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लिम समुदायाचे होते. त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शत्रूच्या स्त्रियांना देखील सन्मानपूर्वक परत पाठवत असत.  

    १९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. 

    गोळवलकर, माधव सदाशिव (गोळवलकर गुरुजी) – profilesमाधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.

    १९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. 

    Gopal krishan gokhale.jpgनामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो.

    या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजकारणी होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

    ‘राजकारणाचे अध्यात्मीकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले.संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.

    १९९७: संगीतकार राम कदम यांचे निधन. 

    राम कदम | Ram Kadam | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics onlineराम कदम यांचा जन्म ऑगस्ट १९१६ रोजी झाला. राम कदम हे मुळचे जिल्हा सांगली मधील मिरज गावाचे रहिवासी होते. राम कदम यांची चित्रपट कारकीर्द पुण्यामध्ये असलेल्या प्रभात फिल्म्समधील एक ऑफिस बॉय म्हणून झाली होती.राम कदम एक लावण्या गाण्यासाठी नावाजलेले संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी चित्रपट माध्यमातूनही आपल्या संगीताचा ठसा उमठवला आहे. राम कदम यांनी १९४० ते १९९० या कालावधीत मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

    राम कदम यांनी जवळजवळ २०० चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत, परंतु त्यांनी जास्तीत जास्त लावण्याच गायल्या आहेत.राम कदम यांनी १९७२ मध्ये पिंजरा चित्रपटांसाठी गायलेली लावणी खूप गाजली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. शांताराम होते.राम कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने राम कदम पुरस्कार दिला जातो.राम कदम १९ फेब्रुवारी १९९७ रोजी स्वर्गवासी झाले.

     

    संदर्भ

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE

    https://krantidev.com/shivaji-maharaj-information-in-marathi/

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0#:~:text=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%20%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF,%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%20%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87.&text=%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A9%20%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87,%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%20%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80.

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87


  • 17 Feb 2022 7:41 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १८२३: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म.

    गोपाळ हरी देशमुख |गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी कोकणातील वतनदार घराण्यात झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव सिद्धये असे होते. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रुढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. गोपाळराव देशमुख यांना ग्रंथसंग्रह करण्याची आणि वाचनाची आवड होती. त्यातही इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. इतिहास विषयावर त्यांनी दहा पुस्तके लिहिली आहेत.

    १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांमध्ये गोपाळ हरी देशमुख हे एक होते. मराठी शाळेत शिक्षण सुरू असतानाच त्यांनी इंग्रजीचे धडे गिरवले. वयाच्या २१ व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते सदर अदालतीची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९६२ मध्ये ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले.हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रतेने वाटे.

    लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान’ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले.

    ‘मातृभाषेतून शिक्षण’ या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते. 

    संदर्भ

    https://www.mymahanagar.com/featured/gopal-hari-deshmukh-birth-anniversary-is-today/259424/#:~:text=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%2C%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95,%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A2%20%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87.


  • 13 Feb 2022 7:32 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १९१६: कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म. 

    पुण्यामध्ये जन्मलेल्या संजीवनी रामचंद्र मराठे या कवयित्री, गीतकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. 

    marathe sanjivani ramchandraमहिला विद्यापीठाच्या जी. ए. व एम्‍. ए. पदव्या त्यांनी संपादन केल्या. शाळकरी वयातच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. या रचनांचा काव्य – संजीवनी ( १९३२ ) हा त्यांचा पहिला संग्रह असला, तरी संजीवनींची रसिकांना खरी ओळख झाली ती राका ( १९३८ ) ह्या संग्रहातून ( काव्य – संजीवनीतील निवडक रचनाही त्यात पुनर्मुद्त केलेली आहे ).त्यानंतरची संजीवनींची कविता संसार ( १९४३ ), छाया ( १९४९ ), चित्रा ( १९५७ ) व चंद्रफूल ( १९५१ ) या कवितासंग्रहांतून प्रकाशित झाली आहे. भावपुष्प ( १९५१ ) व परिमला ( १९५९ ) हे त्यांचे गीतसंग्रह. संजीवनी ( १९७६ ) हा त्यांच्या निवडक कवितेचा संपादित संग्रह. तसेच काही बालगीतसंग्रह व लाडकी लेक ( १९७६ ) ही अनुवादित बालकादंबरिका ह्यांचाही त्यांच्या साहित्यसेवेत समावेश होते.संजीवनींच्या काव्यातून प्रीतीच्या पृथगात्म चित्रणाच्या बरोबरीने सौंदर्यपूजक वृत्ती, सश्रद्धता, वात्सल्यादि स्त्रीसुलभ भाव इत्यादींचा आविष्कारही आढळतो. त्यांचे अनुभवविश्व तसे साधे, व्याप व व्यामिश्रता या दृष्टीनी मर्यादित, असे असले तरी या कवयित्रीने आत्मप्रत्ययाशी व स्वत:च्या काव्यप्रकृतीशी प्रामाणिक राहून निर्मितीतील स्वत्व राखले आहे, हे महत्त्वाचे होय. त्यांच्या अनुभवविश्वाला असलेला निरागसतेचा रंग हे त्याचे एक वेधक वैशिष्ट्य आहे. संजीवनींच्या पुढील काळातील रचनेवर मराठी काव्यातील नवीन प्रवाह, स्थित्यंतरे यांचे बाह्य संस्कार झालेले दिसतात. महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

    २०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.

    Abhijit Kunte - Alchetron, The Free Social Encyclopediaग्रँडमास्टर किताब मिळविणारे ते पहिले पुणेकर आणि दुसरे महाराष्ट्रीय बुद्धिबळपटू. बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे यांच्या या भावाला बहिणीमुळेच बुद्धिबळाची गोडी लागली. मोहन फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवून, अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी बारा वर्षांखालील मुलांच्या गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. त्यानंतर विविध वयोगटातील सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद, आशियाई, कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धांमध्ये अनेक पदके त्यांनी मिळविली आहेत. मानाच्या शिवछत्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 

    फक्त खेळाडू म्हणून न चमकता, या खेळाचा प्रसार करण्यात कुंटे यांचे मोलाचे योगदान आहे. प्रशिक्षक म्हणून अनेक खेळाडू घडवितानाच बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन-संघटन, अनेक खेळाडूंशी एकाच वेळी बुद्धिबळ खेळण्याचे उपक्रम, अशा मार्गांनी अनेक विद्यार्थ्यांना या खेळाची गोडी लावण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. पुण्यासारख्या शहरात गेल्या काही वर्षांत बुद्धिबळ संस्कृती निर्माण करण्यात कुंटे यांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांच्या यशातून अनेक युवा बुद्धिबळपटूंनी प्रेरणा घेतली आहे.

    ऑलिम्पियाडमध्ये चार वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारा कुंटे याला २०००मध्ये ग्रँडमास्टरचा किताब मिळाला. भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण आणि चार कांस्यपदके त्याच्या नावे आहेत. बुद्धिबळाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन, आशियाई स्पर्धेत सात पदके कुंटे याने कमावली आहेत. भारतात हा खेळ आज लोकप्रिय झाला, याचे श्रेय विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे यांच्याबरोबरच कुंटेलाही द्यावे लागेल.

    संदर्भ

    https://vishwakosh.marathi.gov.in/28443/

    https://www.loksatta.com/mumbai/online-conversation-with-grandmaster-abhijit-kunte-in-sahaj-bolta-bolta-zws-70-2701116/


  • 13 Feb 2022 12:00 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म.

    वासुदेव सीताराम बेंद्रे - Wikiwandइतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय.वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा.सी.बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार श्री.वा.सी.बेंद्रे यांचा जन्म दि. १३ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला.

    त्यांचे प्राथमिक शिक्षण कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे इंग्रजी चौथी ते मैंट्रीक पर्यंत मुंबई येथील विल्सन हायस्कूल मध्ये झाले. त्या काळी परीक्षेसाठी सोळा वर्षे वयाची अट होती. त्यामुळे व घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे चौदाव्या वर्षीच त्यांना जी.आय.पी. ऑडीटमध्ये बिन पगारी उमेदवारी पत्करावी लागली. तेथे ३ महिन्यात ते टंकलेखन शिकले व लघुलेखन पद्धतीचा अभ्यास करून अलेनब्रदर्स मध्ये नोकरीला लागले. १९१३ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी लघुलेखन (Short-hand) परीक्षेत पहिल्या नंबरने सुवर्णपदक घेऊन उतीर्ण झाले,

    १९१८ मध्ये ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. महाराष्ट्राचा १७ व्या शतकाचा इतिहास हे संशोधनांचे क्षेत्र बेंद्रे यांनी प्रामुख्याने निवडले. एक साधन-संग्राहक,साधनसंपादक,साधनचिकित्सक,संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका समर्थपणे पार पाडल्या. सन १९२८ मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड "साधन चिकित्सा" हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. .हा ग्रंथ प्रसिद्ध करून विशेषतः नवीन अभ्यासक आणि संशोधक ह्यांना त्यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले

    इतिहास संशोधक बेंद्रे ह्यांचे अगाध कार्य, चिकाटी व इतिहासा विषयीचा त्यांचा अभ्यास पाहून ,१९३८ मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून श्री. खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन वा.सी.बेंद्रे यांना सरकारी " हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर" म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले.

    दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री परत आणली. इंग्लंड मधील वास्तव्यामुळे बेंद्रे यांचे संशोधन-संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले.

    छत्रपति संभाजी महाराज (१९६०) हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. संभाजी महाराज हे एक तेजस्वी, कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते निग्रही स्वराज्यनिष्ठेने आपल्या कारकीर्दीचा क्षण न् क्षण त्यांनी परकीय आक्रमणाशी झगडण्यात घालविला व शेवटी स्वतःचे बलिदान केले, असा निष्कर्ष बेंद्रे ह्यांनी ह्या ग्रंथात काढलेला आहे. त्यांनी बलिदान केले की त्यांचे बलिदान झाले याविषयी मतभेद होऊ शकेल, तथापि संभाजी महाराजांबद्दलच्या रूढ समजुतींना बेंद्रेकृत ह्या चरित्राने धक्का दिला.

    संत तुकाराम महाराजांबद्दलही बेंद्रे ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. १९५० मध्ये श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजकृत श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीता त्यांनी संपादिली. ह्या मंत्रगीतेला त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर त्यांनी पुष्कळच नवीन प्रकाश टाकला आहे. तथापि मंत्रगीता संत तुकारामांची नाही, हेच मत ग्राह्य आहे. देहूदर्शन (१९५१), तुकाराम महाराज ह्यांचे संतसागाती (१९५८), तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा (१९६०) आणि संत तुकाराम (१९६३) हे त्यानंतरचे त्यांचे ग्रंथ तुकाराम महाराजांचा कालखंड व त्यांचे जीवन ह्यांवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनेमहत्त्वाचे आहेत.

    त्यांच्या अन्य ग्रंथांत सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कृत्बशाही (१९३४), अ स्टडी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन्स (१९४४), महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरिअड (१९६०) व श्री छत्रपती शिवाजी महाराज (१९७२) इ. ग्रंथांचा त्यात समावेश होतो. तारीख–इ–इलाही (१९३०), राजाराम चरितम्‌ (१९३१) हे त्यांनी संपादिलेले उल्लेखनीय ग्रंथ होत. लघुलेखनावरही त्यांनी मराठी ग्रंथलेखन केले आहे.

    १९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन.

    कोल्हटकर, भाऊराव – मराठी विश्वकोश प्रथमावृत्तीभाऊराव कोल्हटकर यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ रोजी झाला. त्यांचे शिक्षण बडोदा येथेच झाले. ते जरी फार शिकलेले नसले तरी लेखनिक होण्यापुरते शिक्षण असल्याने बडोद्याला पोलीस आयुक्‍तांच्या कार्यालयात कारकून म्हणून नोकरीला लागले. याच काळात अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीचा ३१ ऑक्‍टोबर १८८० रोजी शुभारंभ केला. त्यावेळी नाटकातील स्त्रीभूमिका पुरुषच करीत. तत्कालीन समाजव्यवस्थेमधे स्त्रियांनी नाटकात काम करणे लोकांच्या पचनी पडणे अवघड होते.

    शाकुंतलच्या शुभारंभानंतर दोन वर्षांनी आपल्या नाटकातील स्त्रीभूमिका करण्यासाठी अण्णासाहेबांनी देखणे रूप आणि आवाज यामुळे भाऊरावांची निवड केली आणि २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांचा वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश झाला.

    संगीत नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग अतिशय चोखंदळ असल्यामुळे स्त्रीसुलभ सवयी त्यांनी आत्मसात केल्या होत्या, तसेच साडी नेसून शोभेसा साजशृंगार करणे व बायकी आवाज व भूमिकेशी प्रसंगानुरूप गाणे म्हणणे ही दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पार पडली. इ. स. १८८२ ते १८८९ पर्यंत भाऊरावांनी स्त्री भूमिका आणि त्यानंतर १९०० पर्यंत सुभद्रेचा अपवाद वगळता, मुखत्वे पुरुष भूमिका केल्या. वर्ष १८८५ मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर भाऊराव कोल्हटकर किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार झाले.

    अण्णासाहेब किर्लोस्करांनी सुरू केलेल्या संगीत रंगभूमीची परंपरा त्यांनी आपल्या १८-१९ वर्षांच्या कारकिर्दीत चांगल्या प्रकारे समृद्ध केली, त्यामुळे महाराष्ट्रातील संगीत रंगभूमीचा खरा प्रसार व उत्कर्ष भाऊरावांनीच केला असे म्हणावे लागेल. १७ मार्च १९०० रोजी पुण्याच्या आर्यभूषण नाटकगृहात भाऊरावांनी शारदा नाटकात केलेली 'कोदंडा'ची भूमिका शेवटची ठरली. १३ फेब्रुवारी १९०१ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

    संदर्भ

    https://vishwakosh.marathi.gov.in/29539/

    https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainikprabhat-epaper-dailypra/vividha+bhaurav+kolhatakar-newsid-n253712618?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=click

  • 12 Feb 2022 12:15 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. 

    नाना फडणवीस | Nana Fadanvishनाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला.

     इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.नाना फडणीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.प्रत्येक ठिकाणच्या "आतल्या" बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.कुणबिणी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, तेलंग, गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते. यांना "नजरबाज" असे म्हणत. हे नजरबाज इतके तेज होते की कित्येकांच्या रोजकीर्दीच्या नोंदीही ते नानांना पाठवत असत.

    थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला.

    १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन.

    महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.

    पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

    १९९८: कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. 

    शब्दारण्य : जन्मशताब्दी- एका बंडखोर कवयित्रीची!आधुनिक मराठी कवयित्री. ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन. पटवर्धन राजघराण्यात तासगाव येथे जन्म. प्राथमिक शिक्षण तासगाव येथे. माध्यमिक शिक्षण पुण्यास. एरंडवणा, पुणे येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम्. ए. झाल्या. शालेय जीवनात त्यांना नाट्यलेखनाची विशेष आवड होती. पन्नादाई  हे त्यांचे नाटक वार्षिक संमेलनात सादर केले गेले होते. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (अप्रकाशित) ही दोन पुरुषपात्रविरहित नाटकेही त्यांनी लिहिली. प्रीतिपथावर (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह.

     प्रितिपथावर  ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्गप्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये.स्वप्नजा  या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका  या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे.

    २००१: अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन.

    Birthday Special Bhakti Barve's famous roleभक्ती बर्वे यांचा जन्म सांगली येथे झाला. शाळेत असतानाच सुधा करमरकर यांच्या प्रोडक्शन हाऊससोबत त्या बालनाटकांमध्ये काम करू लागल्या. त्यांनी निवेदिका म्हणून ऑल इंडिया रेडिओवर देखील काम केले. त्यानंतर त्या मुंबई दूरदर्शनला बातम्या देत असत. अजब न्याय वर्तुळाचा या नाटकामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

    पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले

    त्यांनी केवळ मराठी मध्येच नव्हे तर हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीत देखील काम केले. जाने भी दो यारो या प्रसिद्ध चित्रपटातदेखील त्यांनी नसिरुद्दीन शहा, सतिश शहा, रवी बासवानी यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.

    संदर्भ

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87

    https://vishwakosh.marathi.gov.in/22561/

    https://www.lokmat.com/marathi-cinema/due-shafi-inamdars-death-his-wife-actress-bhakti-barve-died-four-years/


  • 11 Feb 2022 5:47 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९४२: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. 

    Amit Yadav Gauri Deshpande 001.jpgगौरी देशपांडे यांचा पुण्यात जन्म झाला. विख्यात मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे या त्यांच्या आई, तर थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांचे आजोबा होते. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. शालेय शिक्षण अहिल्यादेवी शाळेत झाले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी एमए ही पदवी प्राप्त केली. एस. नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.

    आईच्या निधनानंतर आईवर लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख ही मराठी भाषेत छापून आलेली त्यांची पहिली साहित्यकृती होती. या लेखाची वाचकांनी प्रशंसा केली. त्यांची मातृभाषेतील साहित्यलेखनाची सुरुवात या लेखापासूनच झाली.मराठीत लोकप्रिय ठरलेल्या त्यांच्या लिखाणापैकी ‘एकेक पान गळावया’ (१९८५), ‘आहे हे असे आहे’ (१९८६), ‘निरगाठी आणि चंद्रिके गं सारिके गं’ (१९८७), ‘गोफ’ (१९९९) आणि ‘उत्खनन’ (२००२) ही काही कादंबर्‍यांची नावे. १९७० साली प्रकाशित झालेला ‘The Lackadaisical Sweeper: Short Stories’ हा इंग्रजीतील सुप्रसिद्ध लघुकथासंग्रह त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदानापैकी एक. 

    गौरी देशपांडे यांचे लिखाण मराठीतील उत्कृष्ट स्त्रीवादी लिखाणांपैकी आहे. त्यांच्या लिखाणात वास्तववादी चित्रण असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यांनी ‘The position of women in India’ (स्त्रियांचे भारतातील स्थान) या विषयी पत्रक छापले होते. त्यांनी लिहिलेल्या ‘पाऊस आला मोठा’ नावाच्या एका लघुकथेवर आधारित ‘आम्ही दोघी’ नावाचा चित्रपट आला होता. 

    लेखनाबरोबरच गौरी सुरुवातीच्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात इंग्रजी साहित्य हा विषय शिकवित असत. विंचुर्णी (फलटण) आणि मुंबईतील थोड्या कालावधीसाठीचे वास्तव्य वगळता, आयुष्याचा बराचसा काळ त्या पुण्यात होत्या. अधूनमधून छोट्या मुक्कामांसह परदेश दौरेही झाले.

    संदर्भ

    https://map.sahapedia.org/search/article/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/6319


  • 10 Feb 2022 5:55 AM | Amol Sawarkar (Administrator)

    २००१: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन.

    Mogubai Kurdikar - Vijaya Parrikar Library of Indian Classical Musicकुर्डी (गोवा) येथे जन्म. पाळण्यातळे नाव मोगा. त्यांच्या मातोश्री व गायिका जयश्रीबाई यांचा आवाज गोड असला, तरी व्यासंग करण्याजोगी परिस्थिती नव्हती. मुलीने अभिजात संगीतक्षेत्रात मोठे नाव कमवावे, या तळमळीने त्यांनी खूप धडपड केली. गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात आणि सोमेश्वर-रवळनाथाच्या देवळात चालणाऱ्या भजनांच्या वातावरणात वाढल्याने मोगूबाईंवर लहान वयातच सुरांचा संस्कार झाला. मोगूबाई नऊ वर्षे वयाच्या असताना जयश्रीबाईनी त्यांच्यासह गोव्याच्याच ‘चंद्रेश्वर भूतनाथ संगीत नाटक मंडळीत’ प्रवेश केला. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद इ. नाटकांमधील मोगूबाईंची कामे व गाणी त्याकाळी गाजली. बाळकृष्ण पर्वतकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे धडे दिले. परिणामी मोगूबाईच्या अंगभूत लय-ताल गुणांना प्रोत्साहन मिळून त्यांत त्यांनी पुढे असामान्य प्रावीण्य मिळविले. मोगूबाईंची घरची स्थिती हलाखीची होती. त्यातच वयाच्या दहाव्या वर्षी आईचे छत्रही नाहीसे झाले. १९१७ ते १९१९ या काळात मोगूबाई ‘सातारकर स्त्री नाटक मंडळी’त गेल्या. तिथे ‘शारदा’ , ‘सुभद्रा’, ‘किंकिणी’ अशा यशस्वी भूमिका त्यांनी केल्या. १९१९ मध्ये मोगूबाई सांगलीत आल्या. ‘माडिवरी चल ग गडे’ हे पद त्या गात असता घरावरून जाणाऱ्या अल्लादियाखाँसाहेबांनी योगायोगाने ते ऐकले. मोगूबाईंची त्या वयातील गाण्याची तयारी व समज पाहून त्यांनी आपणहून त्यांना तालीम सुरू केली. १९२१ मध्ये खाँसाहेब मुंबईस आले. मोगूबाईही तालमीसाठी मुंबईस आल्या. नंतर आग्रा घराण्याचे बशीरखाँ व विलायत हुसेनखाँ यांची त्यांनी तालीम घेतली. १९२७ ते १९३२ या काळात अल्लादियाखाँसाहेबांनीच आपले बंधू हैदरखाँ यांची तालीम मोगूबाईंना देवविली. अल्लादियाखाँसाहेबांनी १९३४ मध्ये गंडाबंधन करून मोगबाईंना तालीम सुरू केली, ती खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत (१९४६), मोगूबाईंच्या कठोर गानसाधनेमुळेच त्यांना रसिकांकडून ‘गान तपस्विनी’ ही सन्मान्य उपाधी मिळाली.

    मोगूबाईंच्या सावनी नट, जयतकल्याण, शुद्ध नट, बसंत बहार, भूप नट, संपूर्ण मालकंस अशा अनवट रागांतून द्रुत चिजा बांधल्या आहेत त्या त्यांचा सर्जनशीलतेच्या निदर्शक आहेत. स्वतः आयुष्य भर केवळ ख्यालगायकीचा पाठपुरावा करत असतानाही त्यांनी ठुमरी, भजन आदी उपशास्त्रीय प्रकारांकडेही रसिक व मर्मग्राही दृष्टीने लक्ष पुरवले.

    मोगूबाईंना अनेक मानसन्मान मिळाले : संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९६८), पद्मभूषण (१९७४), गोव्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात संगीत रिसर्च अकादमीचे पारितोषिक (१९८०) 

    संदर्भ

    https://vishwakosh.marathi.gov.in/30518/#:~:text=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%20%3A(%E0%A5%A7%E0%A5%AB,%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%20(%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE)%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE.&text=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0,%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%20%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%2C%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE.


<< First  < Prev   1   2   3   4   5   ...   Next >  Last >>