Menu
Log in


Log in


This section of articles is to collect the information referring to the history we should be proud about. The content will beadded with reference to the source and the contributing person name keep the credits. Note that following the organisational non-political stand, articles relating to politics may be avoided.

  • 8 Feb 2022 9:47 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

    श्यामची आईमुलांवर संस्कार करणं हे आपल्या पालकांना महत्त्वाचं वाटतं. ‘संस्कार’ हा आपल्याकडे टिकून राहिलेला शब्द आहे. त्याला इंग्लिशमध्ये समांतर शब्द नाही. एके काळी upbringing हा शब्द होता. आता तो कोणी वापरत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीने इतर मूल्ये स्वीकारली आहेत. आपण जी होती, ती जपून ठेवली आहेत. अशा ह्या आपल्या संस्कृतीविषयी ज्या ग्रंथात कलात्मकतेने भाष्य केलेलं आहे, तो ग्रंथ लोकप्रिय होणारच. आणि काही काळाने तो पूजनीयदेखील होऊ शकतो. ‘श्यामची आई’चं तसं झालं आहे. म्हणून हे पुस्तक आपल्या घरी असावं, असं आपल्याला आवर्जून वाटतं. आपण ते वाचलंच पाहिजे, अशी भावना आपल्यात निर्माण होते. पुस्तक आपल्याकडे असणं, ते आपण वाचणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असं आपण समजतो. ‘श्यामची आई’अजरामर झालं आहे ते ह्या कारणांमुळे.

    दि. 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या कारागृहात साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ लिहायला घेतलं आणि 13 फेब्रुवारीला म्हणजे अवघ्या पाच दिवसात पूर्णदेखील केलं. फेब्रुवारी 1935 मध्ये ‘श्यामची आई’ ची पहिली आवृत्ती आली आणि 86 वर्षं झाली तरी विविध प्रकाशनांकडून आवृत्त्या येतच आहेत. आजपर्यंत ‘श्यामची आई’च्या लक्षावधी प्रती वाचकांपर्यंत पोचल्या. 1953 मध्ये आचार्य अत्रेंनी या पुस्तकावर आधारित मराठी सिनेमा आणला. राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णपदक या सिनेमाला मिळालं. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाताना ‘श्यामची आई’ची नाट्यरूपांतरं झाली, अभिवाचनं झाली. विविध भाषांत अनुवाद झाले. त्यामध्ये हिंदी, इंग्रजी, गुजराती, आसामी, अरेबिक सिंधी, उर्दू, संस्कृत, कानडी, मल्याळी इत्यादीच नव्हे तर जापनीज भाषेचादेखील समावेश आहे

    १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. 

    राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद |

    धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!

    ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!

    हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!

    अशा काव्यांतून स्वातंत्र्याची ललकारी देणारे, राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून कवी गोविंद यांचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका वठविणाऱ्या सावरकरांच्या अभिनव भारत ऊर्फ मित्रमेळा संघटनेच्या कार्यात कवी व एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती. काव्य, कवित्व व स्वातंत्र्यत्व ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती.

    बालपणीच कमरेपासून खालचा भाग लुळा पडला असल्याने कवी गोविंद यांनी अंथरुणावर पडूनच अनेक काव्य, पद्ये लिहिली. त्यांचे घर म्हणजे अभिनव भारतचे मुख्य ठिकाणच होते. त्यांच्या घरी संघटनेच्या नियमित सभा होत. पुस्तकालय, ऐतिहासिक किंवा इतर सामान ठेवण्याची ती जागाच होती. स्वातंत्र्यवीर सावरकर व लोकमान्य टिळकांसह अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या सहवासाने त्यांच्या स्फूर्तीदायक कविता बहरत गेल्या. छत्रपती शिवाजी महारांजावरही त्यांनी अनेक काव्य, पोवाडे गायले होते.

    १९१०च्या दशकात गोविंदांचे काव्य सरकार जमा झाल्याच्या नोंदी आढळतात. पण प्रत्यक्षात त्याचे पुढे काय झाले, याबाबत विशेष माहिती मिळत नाही. गोविंद यांच्या मृत्यूनंतर (१९२६) त्यांच्या काही मित्रांनी त्यांची उरलेली कवने प्रसिद्ध केली होती.

    १९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. 

    Remembering Raja Paranjpe, the legendary actor, director, producer, and writer in Marathi cinema, on his 109th birth anniversary today. | by Bollywoodirect | Mediumशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बसवलेल्या माधवराव जोशी यांच्या ‘विश्ववैचित्र्य’ नाटकात एका कलावंताने एक विनोदी भूमिका केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तारुण्यात आले, तो मूकपटांचा काळ होता. अशा मूकपटांना पार्श्वसंगीत देण्याच्या इराद्याने या कलावंताने चित्रपटगृहामध्ये प्रवेश मिळवला आणि तेथून या माध्यमाशी त्यांचा संबंध जुळून आला. राजा परांजपे यांचा जन्म २४ एप्रिल, १९१० रोजी झाला होता. राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं वेड होतं. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थीदशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण, रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण, त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना ‘लपंडाव’ या नाटकात अचानक संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना ‘सावकारी पाश’ या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर ते भालजी पेंढारकर यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. ‘सावकारी पाश’मधील भूमिकेनंतर ते छोटी-मोठी कामे करत होते. पण, खर्‍या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये ‘बलिदान’च्या माध्यमातून.

    राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांनी स्वतः काम केले अशा ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते. अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. ‘पाठलाग’ या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला.

    व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये हे परांजपे यांच्या चित्रपटातील बलस्थान असे. त्यांनी इतर दिग्दर्शकांबरोबर केलेल्या चित्रपटांतूनही ही गोष्ट आवर्जून असे. परांजपे यांना आपली संस्कृती, कुटुंबपद्धती, समाज याबद्दल प्रचंड आदर होता आणि तो त्यांच्या चित्रपटांतून प्रतिबिंबित होत असे. त्यांच्या पात्रांमधील संवाद हा बहुधा ओघवते संभाषण वाटे. त्यामुळे त्यातून एका क्षणाला हासू तर दुसर्‍या क्षणाला आसू, असेही होऊ शके. एक यशस्वी चित्रकर्ता म्हणून कारकिर्द असलेल्या राजा परांजपे यांना प्रेक्षक आणि समीक्षक यांनी भरभरून दाद दिली. केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजी वृत्तपत्रांतूनही त्यांच्याबद्दल रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध होत असे. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी दोन राष्ट्रीय आणि चार राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त केले. एकूण २७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते.  राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी, १९७९ रोजी निधन झाले.

    २००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन.

    baba-amteबाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. त्यांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार होते. खानदानी श्रीमंती घराण्यात चालत आलेली होती. त्यांचे बालपण ऐश्वर्यात गेले. बाबा आमटेंना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. महाविद्यालयीतन दिवसांत बाबा आमटेंनी भारताची परिक्रमा केली. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनी ते अत्यंत प्रभावित झाले. टागोरांसह साने गुरुजींचाही त्यांच्यावर बराच प्रभाव होता. बाबा आमटेंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ वकिलीही केली.  १९४२ च्या सुमारास एकदा बाबा आमटे रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यांनी इंग्रजांना थोपवून धरले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली, तेव्हा बाबा आमटेंनी ती तेथेच अडवून ठेवली. अलोट गर्दी स्थानकावर जमली. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा महात्मा गांधीजींना समजली, तेव्हा त्यांनी बाबा आमटेंना 'अभय साधक' अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.

    एकदा फेरफटका मारत असताना त्यांनी एक कुष्ठरोगी पाहिला. हातपाय झटलेले, भर पावसात भिजत असलेला माणूस पाहून बाबा भयभीत झाले. त्या माणसाची बाबा आमटेंनी सेवा, सुश्रुषा केली. मात्र, तो फार काळ जगला नाही. हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे बाबांना समजले. आपले उर्वरित आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी द्यायचे, हाच ध्यास त्यांनी धरला. तत्कालीन समाजात कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जात असे. कुष्ठरोग्यांना वाळीत टाकले जात असे. १९५२ मध्ये वरोऱ्याजवळ बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली. आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याची केवळ सुश्रुषा करायची नाही, तर त्याला आत्मनिर्भर करण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे, तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा निर्माण केल्या. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली.

    रॅमन मॅगसेसे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार, डेमियन डट्टन पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क पुरस्कार, आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा रोल ऑफ ऑनर, पर्यावरणासंदर्भातील ग्लोबल ५०० पुरस्कार, पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार, राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, असे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी बाबा आमटेंना सन्मानित करण्यात आले असून, पद्मश्री, पद्मविभूषण, अपंग कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार, राष्ट्रीय भूषण पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, एन. डी. दिवाण पुरस्कार, राजा राम मोहनराय पुरस्कार, भरतवास पुरस्कार, जी. डी. बिर्ला पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार, जस्टिस के. एस. हेगडे पुरस्कार, डी. लिट - नागपूर विद्यापीठ, डी. लिट. - पुणे विद्यापीठ, देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट), विश्वभारती पुरस्कार, अशा भारतीय पुरस्कारांनी बाबा आमटे यांना गौरविण्यात आले. ९ फेब्रुवारी २००८ रोजी बाबा आमटे यांचे निधन झाले.

    संदर्भ

    https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88

    https://weeklysadhana.in/view_article/shanta-gokhale-on-her-experience-of-translating-shyamchi-aai

    https://maharashtratimes.com/sahir-poet/articleshow/30066690.cms

    https://www.mahamtb.com/Encyc/2021/2/20/article-on-raja-paranjpe-.amp.html

    https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/death-anniversary-of-baba-amte-who-did-rehabilitation-and-empowerment-of-people-suffering-from-leprosy/articleshow/74041259.cms


  • 5 Feb 2022 12:40 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.

    श्री बाबामहाराज सातारकर यांची माहिती - Baba Maharaj Satarkar information in Marathi - Marathi Biographyमहाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे.  त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.

    १९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे.

    लोणावळ्यापासून ८ कि. मी. अंतरांवर दुधिवरे येथे १६ एकर जागेत बाबामहाराजांनी आध्यत्मिक केंद्र उभे केले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार (१९८६), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार (१९९०), पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र (१९९०), सासवड नगरपरिषदेतर्फे सत्कार (१९९०), महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते मानपत्र (१९९१), सरगम कॅसेट कंपनीद्वारे प्लॅटिनम डिस्क विमोचन आणि तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्य यांच्या हस्ते सत्कार (१९९२), जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार (१९९४) अशा विविध मानपत्रांनी आणि सत्कारांनी  त्यांचा सन्मान करण्यात आला.

    १९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म. 

     Tulpule Shankar Gopalडॉ.शंकर गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुणे येथे झाला. एम.ए. पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी बेळगाव, धारवाड आणि सोलापूर येथे मराठीचे अध्यापन केले. ‘यादवकालीन मराठी भाषा’ या विषयावरील प्रबंधास त्यांना पीएच.डी. मिळाली. पुणे विद्यापीठात ते मराठी विभाग प्रमुख होते. जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठाचे अभ्यागत प्राध्यापक हा सन्मान त्यांना प्राप्त झाला. प्राचीन मराठी भाषेच्या संदर्भात तुळपुळे यांनी केलेले संशोधन वाङ्मयाच्या इतिहासात अत्यंत मोलाचे ठरते.‘पांच संतकवी’, ‘प्राचीन मराठी गद्य’, ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’, ‘मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल’, ‘महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय’, ‘भक्तीचा मळा’, ‘महानुभाव पद्य’, हे ग्रंथ त्यांनी लिहिले. गुरुदेव रानडे उर्फ रा.द.रानडे हे त्यांचे गुरू होते. त्यांच्यासंबंधी त्यांनी ‘गुरुदेव रानडे: चरित्र आणि तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ लिहिला.‘लीळाचरित्र’, ‘दृष्टान्तपाठ’, ‘ऋद्धिपूरवर्णन’, ‘श्रीकृष्णचरित्र’, ‘मराठी निबंधाची वाटचाल’, ‘माधवस्वामीकृत योगवासिष्ठ’ या ग्रंथाचे टीपा शब्दसंग्रह, प्रस्तावना यांसह संपादन केले. महानुभाव वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता.

    १९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली.

    आळंदीत जोग महाराज पुण्यतिथी साजरी - महा Bulletin Newsविष्णू नरसिंह जोग हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते.  ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी, शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरीच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.

    विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.

    विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.

    संदर्भ

    https://marathivishwakosh.org/51794/

    https://maharashtranayak.in/taulapaulae-sankara-gaopaala

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97

    https://prahaar.in/vishnubuva-jog/


  • 4 Feb 2022 5:49 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म. 

    भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) – मराठी विश्वकोशभीमसेन गुरुराज जोशी. त्यांचा जन्म गुरुराज व रमाबाई या दांपत्यापोटी धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी झाला. त्यांचे मूळ गाव गदगजवळचे होंबळ असून आजोबा भीमाचार्य हे गदगमध्ये स्थायिक झाले होते. ते कीर्तनकार-गायक होते. भीमसेन यांची आईही सुमधुर भजने म्हणत असे, तर वडील गुरुराज हे शिक्षक असून वेदान्तपारंगत होते. त्यांचे घराणे वंशपरंपरागत ज्योतिषी होते.

    ची गाण्याची आत्यंतिक आवड पाहून वडलांनी उ. इनायतखाँ यांचे गदगमधील शिष्य अगसरू चन्नाप्पा कुर्तकोटी ह्यांच्याकडे भीमसेन यांना गाण्याची शिकवणी सुरू केली. त्यांच्याकडून  वर्षभरात २०-२१ रागांशी त्यांचा प्राथमिक परिचय झाला; पण सखोल ज्ञानाची आस लागून राहिली. गुरूच्या शोधात ते घराबाहेर पडले आणि उपाशी-अर्धपोटी, रेल्वेने विनातिकीट प्रवास करत ग्वाल्हेरला हाफीज अलीखाँ यांच्याकडे (सरोदवादक अमजद अलीखाँ यांचे वडील) पोहोचले.

    पुढे कोलकात्याला (पूर्वीचे कलकत्ता) पहाडी संन्याल  ह्यांच्याकडे गांधारी हा अनवट राग, धृपदिये मंगतराम ह्यांच्याकडे धृपद संगीताची तालीम घेतली. सवाई गंधर्वांकडे त्यांनी निरलसपणे गुरुसेवा करून व अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. गंधर्वांनी पुढच्या शिक्षणाला अचानक नकार दिल्यामुळे भीमसेन रामपूर संस्थानात मुश्ताक हुसेनखाँ साहेबांकडे गेले.  पुढे सवाई गंधर्वांनी भीमसेन यांना पुन्हा बोलावले. त्यांच्याकडे तोडी, मुलतानी व पूरिया ह्या फक्त तीन रागांचा सराव तीन वर्षे चालला. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या पुण्याच्या समारंभात ते प्रथमच चमकले (१९४६). कोलकात्याला झालेल्या एंटाली संगीत महोत्सवात त्यांनी सादर केलेल्या गायनास बंगाली रसिकांनी भरभरून दाद दिली (१९५३). भीमसेनांची कीर्ती देशात व विदेशांतही पसरत गेली.धन्य ते गायनीकळा  ह्या नाटकाचे त्यांनी संगीत-दिग्दर्शन केले (१९६८). गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे ह्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् ह्या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात (१९९७) संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा ह्या राष्ट्रैक्याच्या बहुभाषिक गीतातील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे.

    पं. भीमसेन जोशी यांना शासनाकडून पद्मश्री (१९७२), पद्मभूषण (१९८५), पद्मविभूषण (१९९९) ह्या व २००८ मध्ये ‘भारतरत्न’ ह्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्यांव्यतिरिक्त संगीतरत्न (१९७१), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ह्यांनी त्यांना सन्मान्य डी. लिट पदवी प्रदान केली.सवाई गंधर्वांना देवाज्ञा झाल्यावर (१९५२) नानासाहेब देशपांडे (सवाई गंधर्वांचे जावई) व पं. भीमसेन यांनी पुण्यात ‘सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव’ सुरू केला (१९५३). त्यास उत्तरोत्तर श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद मिळाला. पुढे ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ हा राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम झाला. या महोत्सवास नामांकित गायक-गायिका हजेरी लावतात. पं. भीमसेन यांच्या गायनाने या महोत्सवाचा शेवट होत असे. 

    १६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

    गड आला पण सिंह गेला..... - Newsuncutतानाजी मालुसरे हा मराठा साम्राज्याचा सेनापती होता. मराठा साम्राज्याचे नाव ऐकल्यावर फक्त शिवाजीं महाराजांचे नाव आठवते, पण तानाजी मालुसरे हेच त्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी सिंहगड सारख्या मोगलांचा मजबूत किल्ला जिंकला. एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. महाराजांचा संदेश मिळत्याक्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं. तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्या देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले.

    महाराजांनी सांगितले की आता कोंढणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जगहसाई होता कामा नये. तेव्हा तानाजींनी चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे. "हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत. .रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर द्रोणगिरीचा कडा  चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले.

    तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". 

    १८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. 

    Karve Chintaman Ganeshचिंतोपंत कर्वे यांचा जन्म बडोद्यास झाला. तथापि त्यांचे शिक्षण पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व फर्गसन महाविद्यालयात झाले. १९१७ मध्ये ते गणित विषय घेऊन पदवीधर झाले. डॉ.श्री.व्यं.केतकर यांनी मराठी ज्ञानकोशाची योजना सिद्ध करण्यासाठी उभारलेल्या कंपनीत कर्वे दाखल झाले, तसेच य.रा.दाते हेही सहभागी झाले. केतकरांच्या हाताखाली कर्वे यांना ज्ञानाचे संकलन करण्याची कला अवगत झाली, भरपूर वाचन झाले व अभ्यास घडला. कोशविद्येचे मर्म हाती आले. नियमितपणे परिश्रम करण्याची सवय लागली. या जोडीने केतकरी खाक्यात काम करण्यास लागणारे धैर्य व चिकाटी दाखवली म्हणूनच नेटाने काम करून ते ‘कोशकार’ झाले. कर्वे यांचा प्रपंच कसाबसा चालला, परंतु त्यांनी कधी तोंड वेंगाडले नाही किंवा आपल्या कामात उणेपणा येऊ दिला नाही.

    कोशकार्याखेरीज कर्वे यांनी ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’ (१९३१), ‘प्राच्य आणि पाश्चात्त्य नीतिध्येये’ (१९३७), ‘आनंदीबाई पेशवे’ (१९४०), ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’ (१९५७), ‘कोशकार केतकर’ (य.रा.दाते ह्यांच्या सहकार्याने, १९५९) यांसारखी पुस्तके लिहिली. शिवाय निरनिराळ्या नियतकालिकांतून भाषा, वाङ्मय, इतिहास, संस्कृती आदी विषयांवर चारशेहून अधिक लेख लिहिले. कर्वे यांच्या लेखनात माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा जाणवतो.

    महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन उंचावणार्‍या अनेक कार्यांत कर्वे आपुलकीने लक्ष घालीत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा त्यांनी अनेक वर्षे संभाळली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिटणीस पदावरही ते होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे कर्वे हे दहा वर्षे चिटणीस होते. पुणे विद्यापीठाच्या सदस्य मंडळावर ते होते. ग्रंथ प्रकाशन आणि प्रकाशन अनुदान समितीत ते कार्यरत होते. सरकारच्या पेशवे दप्तर समितीचे सदस्यही ते होते. काम पत्करले की त्या-त्या संस्थांच्या सभांना नियमितपणे हजर राहून ते त्यात आपला वाटा उचलत. 

    संदर्भ

    https://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/about-tanaji-malusare-119111900031_1.html

    https://marathivishwakosh.org/9572/

    https://maharashtranayak.in/karavae-caintaamana-ganaesa


  • 2 Feb 2022 8:20 PM | Amol Sawarkar (Administrator)

    १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. 

    उमाजी नाईक (Umaji Naik) – मराठी विश्वकोशउमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती. उमाजी लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत. आपल्या वडिलांकडून त्यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इ. कौशल्ये आत्मसात केली होती. उमाजी ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१८०२) आणि वंशपरंपरेने वतनदारी त्यांच्याकडे आली.

    उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती. १८२५ मध्ये सत्तू मृत्यू पावल्यानंतर त्याच्या टोळीचे उमाजी प्रमुख झाले. उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने २८ ऑक्टोबर १८२६ रोजी इंग्रजांनी त्यांच्याविरुध्द पहिला जाहीरनामा काढला. यामध्ये उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यांना १०० रु. चे बक्षीस जाहीर केले. इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्यासाठी स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती केली व १५२ ठिकाणी चौक्या बसविल्या, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत. 

    उमाजी आपल्या हातामध्ये येत नाही म्हटल्यावर इंग्रजांनी त्यांची पत्नी, दोन मुले व एका मुलीस कैद केले. तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले. इंग्रजांनी त्यांचे सगळे गुन्हे माफ केले व आपल्या पदरी नोकरीस ठेवले. १८२८–२९ या काळात उमाजींकडे पुणे व सातारा या भागात शांतता ठेवण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक मार्गांनी पैसा जमा केला. त्यामुळे इंग्रजांनी ऑगस्ट १८२९ मध्ये त्यांच्यावर लुटमारी, खंडण्या गोळा करणे, मेजवाण्या घेणे इत्यादी आरोप ठेवले; परंतु नोकरीतून काढून टाकले नाही. या काळात उमाजींनी इंग्रजांविरोधात सैन्य जमवण्यास सुरुवात केली होती. भाईचंद भीमजी प्रकरणात त्यांनी पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आल्यावर इंग्रजांनी अचानक उमाजींना कैद केले; मात्र त्यातूनही निसटून ते कऱ्हे पठारावर गेले. या ठिकाणाहून इंग्रजांच्या विरोधात त्यांनी कारवाया सुरू केल्या.

    पुढच्या पाच वर्षात हे बक्षीस आधी १२०० रु आणि नंतर ५००० र. एवढे वाढवले गेले.  त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी देण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता.

    संदर्भ

    https://marathivishwakosh.org/29143/


  • 31 Jan 2022 5:55 AM | Amol Sawarkar (Administrator)

    २०००: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन.

    वसंत शंकर कानेटकर (Vasant Shankar Kanetkar) – मराठी विश्वकोशलोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी झाला.

    संत कानेटकर यांचे सुरुवातीचे आयुष्य पुण्यात गेले. त्यांचे वडील, कवी गिरीश, हे रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या आणि रविकिरण मंडळातील इतर कवी यांच्या सहवासातून वसंत कानेटकरांना साहित्यात रस निर्माण झाला. ते लहानपणी नाटिका लिहीत आणि त्यांच्या बालमित्रांसोबत त्यांचे सादरीकरणही करीत.

    कानेटकरांनी १९४२-४३ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली. उच्चशिक्षण घेत असताना कानेटकरांना वि. स. खांडेकर आणि कन्नड साहित्यिक, आणि तत्कालीन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य वि. कृ. गोकाक दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. कानेटकरांच्या मते, त्यांच्या लेखन व शैक्षणिक कारकीर्दीसाठी आवश्यक असलेली जिज्ञासू वृत्ती, अनुशासन आणि चिकाटी ही त्यांना खांडेकरांकडून मिळाली. कानेटकरांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून एम.ए.ची पदवी संपादन केली (१९४६).

    १९४६ मध्ये कानेटकर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एच. पी. टी. आर्टस् कॉलेजमध्ये मराठी व इंग्रजीचे व्याख्याते म्हणून रुजू झाले. पुढे त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली आणि या संस्थेचे ते आजीव सदस्यदेखील झाले.

    १९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. हे नाटक भालबा केळकर यांनी दिग्दर्शित केले, तर पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनने त्याची निर्मिती केली. कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले. कानेटकरांचे पुढचे नाटक अश्रूंची झाली फुले हे त्यांचे सर्वांत यशस्वी नाटक. हे एक सामाजिक, भावनाप्रधान नाटक होते.

    कानेटकरांचे लेखक म्हणून अनेक शैलींवरील प्रभुत्व, विषयांचे वैविध्य, नाट्यतंत्रावरील पकड, भाषासौंदर्य आणि संस्मरणीय संवाद यांकरिता ते प्रख्यात होते. १९५० च्या दशकात व्यावसायिक मराठी रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्याचे आणि पुढची चार दशके एकापाठोपाठ एक सरस आणि यशस्वी नाटके देऊन तिला समृद्ध करण्याचे श्रेयही मोठ्या प्रमाणात त्यांना जाते. वेड्याचे घर उन्हांत या नाटकापासून त्यांची नाटककार म्हणून वाटचाल सुरू झाली आणि पुढची चाळीस वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली.

    महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात व्यक्तींच्या आयुष्यावर कानेटकरांनी चरित्रनाटके लिहिली. या चरित्रनाटकांचे वर्णन कानेटकरांनी स्वतः “कर्मयोगी शोकात्मिका” असे केलेले आहे. हिमालयाची सावली (धोंडो केशव कर्वे), वादळ माणसाळतंय (बाबा आमटे), विषवृक्षाची छाया (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे), कस्तुरीमृग (हिराबाई पेडणेकर) आणि तू तर चाफेकळी (बालकवी ठोंबरे) ही ती नाटके आहेत.

    ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९८८). त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव (१९९०) आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (१९९२).

    वसंत कानेटकर यांचे नाशिक येथे निधन झाले.

    १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

    100 Years of Mooknayak, Ambedkar's First Newspaper that Changed Dalit Politics Foreverसमाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले

    या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या.

    १९९६: हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.

    Govindrao Patwardhan - Alchetron, The Free Social Encyclopediaहार्मोनिअम वादनाच्या संदर्भात दोन ‘गोविंदरावांचा’ उल्लेख आदराने केला जातो : पहिले गोविंदराव टेंबे व दुसरे गोविंदराव पटवर्धन. कितीही मुश्कील गायकी असली तरी टीपकागदाप्रमाणे ती उचलून आपल्या वादनात सहीसही उतरवणारे गोविंदराव पटवर्धन हे उत्तम एकल हार्मोनिअम वादक म्हणूनही प्रसिद्ध होते.

    आपल्या आजोळी, गुहागरजवळच्या अडूर या कोकणातल्या गावी गोविंदराव विठ्ठल पटवर्धन यांचा जन्म झाला. ते १९३० च्या सुमारास वडिलांबरोबर मुंबईस आले. व्हर्न्याक्युलर फायनलनंतर त्यांचे आर्यन एज्युकेशन स्कूलमध्ये शिक्षण झाले व १९४२ साली ते मॅट्रिक झाले. ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजीविकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली, मात्र त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.

    गोविंदरावांनी १९४२ पासून मुंबई मराठी साहित्य संघ, ललितकलादर्श व इतर अनेक नाट्यसंस्थांच्या संगीत नाटकांच्या हजारो प्रयोगांना ऑॅर्गनची साथ केली. त्यांची स्मरणशक्ती व अंगातील धमक जबरदस्त होती, त्यामुळे शेकडो संगीत नाटके त्यांना मुखोद्गत होती व त्यांचे तासन्तास चालणारे शेकडो प्रयोग त्यांनी लीलया वाजवले. नाटकात गायकाची पट्टी कोणतीही असो, ऑॅर्गनवर ते नेमकेपणाने सूर देऊन त्या पट्टीत सहजपणे साथ करत.

    रूढार्थाने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांपासून ते वंचित राहिले. पण त्यांच्या वादनाला मिळणारी गवैयांची व रसिकांची दाद हा पुरस्कार-शिरोमणी त्यांच्या मुकुटात नेहमीच होता. गोविंदरावांना मुंबईतील राहत्या घरी पहाटे हृदयविकाराचा सौम्य झटका आला व त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला.

    संदर्भ

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95

    https://marathivishwakosh.org/52472/

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8

  • 30 Jan 2022 12:46 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९११: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. 

    गजाननराव यांचा   जन्म गिरगाव, मुंबई येथे झाला. त्यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी व आजोबा मनोहरबुवा हे देखील उत्तम गवई होते. विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडून ते तबला शिकले. यथावकाश त्यांनी रामकृष्णबुवा वझे (ग्वाल्हेर घराणा) आणि प्रौढवयात उस्ताद भूर्जीखाँ (जयपूर घराणा), उस्ताद विलायत हुसेनखाँ (आग्रा घराणा) यांच्याकडेही गाण्याची तालीम घेतली.वयाच्या साधारण सोळाव्या वर्षापासून व्हायोलीनवादनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. त्यांना पुण्यामध्ये भारत गायन समाजात संगीतशिक्षकाची नोकरी मिळाली. १९२८ पासून त्यांनी मुंबई आकाशवाणीवर गायन व व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या व्हायोलीनवादनाची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. पुढे दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले. या नोकरीमुळे त्यांची मुंबई, इंदूर, लखनऊ अशी अनेक ठिकाणी भ्रमंती झाली (१९५६–१९६८). गजाननबुवा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातही प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक संगीतपरिषदांमधून भाग घेतला होता.गजाननरावांना १९७२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, आयटीसी सन्मान (१९८२) व मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार (१९८५) लाभला.

    १९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.

    मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा नट रमेश देव – Marathisrushti Articlesरमेश देव यांचा जन्म अमरावतीत झाला पण ते   प्रत्यक्षात जोधपूर राजस्थानचे आहेत. त्यांचे मोठे आजोबा अभियंता होते आणि वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते.रमेश १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून “पटलाची पोर” चित्रपटात दिसले. त्याने ‘सीमा देव’ या नामांकित अभिनेत्रीशी लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुलगे आहेत.कोल्हापूर हे कलाकारांचे शहर. या शहराने अनेक कलावंत चित्रपटसृष्टीला दिले. रमेश देव हे त्यातीलच एक. त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, एवढे मोठे योगदान त्यांचे आहे. एक काळ तर असा होता, की रमेश आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची.रमेश देव यांनी नायकाच्या भूमिका केल्याच, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. 'भिंगरी' चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.

    तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा 'सर्जा' हा ऐताहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला.

    अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या 'आनंद' चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली. 

    १९४९: नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अ‍ॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म

    Satish Alekar 01.jpgआळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले. इ.स. १९७२ साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्‌सी. झाले. तत्पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी.एस्‌सी. झाले होते.

    शाळकरी वयात 'शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होते. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये ('पीडीए'मध्ये)आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.

    'मेमरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली.सतीश आळेकर यांनी 'दिनूच्या सासूबाई राधाबाई',बेगम बर्वे,’ओळख', 'काळोख' या नाटकात आणि 'चिंटू',चिंटू - २,'व्हेंटिलेटर',भाई,भाई - २, मी शिवाजी पार्क, अय्या,चि व चि सौ कां ,राजवाडे अँड  सन्स,स्माईल प्लिज,हाय वे,देऊळ बंद,जाऊंद्या ना बाळासाहेब इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.तसेच जैत रे जैत, कथा दोन गणपतरावांची ह्या चित्रपटांचे लेखनही केले

    रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत.रविवारच्या ‘लोकसत्ते’तील ‘लोकरंग’ या पुरवणीमध्ये सतीश आळेकर ‘गगनिका’ नावाचे सदर लिहीत असत. हे सदर पुढे त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचे नसलेले, पण नाटकाविषयी असलेले’ असे आहे. १९७५ची आणीबाणी आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह आळेकरांनी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे.

    संदर्भ

    https://marathivishwakosh.org/31018/

    https://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-107051900006_1.htm

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0


  • 29 Jan 2022 7:39 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म.

    संत निवृत्तिनाथ ! - बालसंस्कार हिंदीज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.गैनीनाथ व गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथापि निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे.ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते.

    १९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

    Bhakti Barve- Tula Shikwin Chaanglaach Dhada (Tee Phoolrani, P.L. Deshpande) - YouTubeइंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

    भक्ती बर्वें मुंजुळेची भूमिकेत नि सतीश दुभाषी प्रोफेसरच्या

    पुलंच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष, हेमांगी कवी अशानी ‘फुलराणी’ उभी केली. या सगळ्यांनी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.

    १९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.

    सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील, आजोबाही डॉक्टरच होते. आजोबांचा ग्रंथसंग्रह समृद्ध होता आणि सदाशिवला वाचनाची खूप आवड होती. आजोबांच्या मृत्यनंतर सदाशिव एकाकी झाले. त्यांना पुढील शिक्षणासाठी वडिलांनी पुण्यास पाठविले.जोगळेकर पेशाने वकील होते. तथापि लहानपणापासून त्यांचा ओढा साहित्याकडेच होता. ‘मॅझिनीची जीवन कहाणी’ आणि ‘मानवी कर्तव्ये’ या नावाने भाषांतराचा संग्रह प्रकाशित करून त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली.      आरंभीच्या काळात अनेक नियतकालिकांशी ते संबंधित होते, पण लेखक आणि संपादक म्हणून त्यांचा बोलबाला झाला तो ‘यशवंत’ या मुख्यत: कथा साहित्याला वाहिलेल्या मासिकाचे त्यांनी संपादकत्व पत्करल्यावर. अखेरच्या काळात त्यांनी उत्तम रहस्यकथाही लिहिल्या. किंबहुना मराठीतील रहस्यलेखनाचे ते जनक मानले जातात.संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे. त्यातील कथा अतिशय वेधक आहेत. ‘सूर्यफूल’ हा त्यांचा इतर कथांचा आणखी एक संग्रह, त्यांच्या मरणोत्तर तो प्रकाशित झाला.     जोगळेकर उत्तम फोटोग्रफरही होते आणि दिलरुबा नावाचे वाद्यही उत्तम वाजवत असत. कामाच्या निमित्ताने त्यांनी कांजीवरमपासून पेशावरपर्यंत प्रवास करताना शेकडो प्राचीन नाणी जमवली व त्यांचा उत्तम संग्रहही केला होता.संदर्भ

    https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-nivruttinath/

    https://maharashtranayak.in/jaogalaekara-sadaasaiva-atamaaraama


  • 28 Jan 2022 5:40 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र

    राजमुद्रा ग्राफिक्स - Home | Facebookपत्राची तारीख तेव्हा रूढ असलेल्या कालगणनेनुसार ‘२० जिल्हेज, शुहूर सन १०४६’ अशी आहे. ती २८ जानेवारी १६४६ या तारखेशी जुळते. म्हणजे हे पत्र लिहिले तेव्हा शिवाजी महाराजांच्या वयाची १६ वर्षे पूर्ण व्हायला २१ दिवसांचा अवधी होता. शिवाजीमहाराजांची म्हणून लिहिलेली या तारखेपूर्वीची चार पत्रे आजवर उजेडात आली आहेत. तरीही त्यांचा शिक्कामोर्तब असलेले सर्वात जुने पत्र आहे यात काही संशय नाही.खेडेबारे तरफेतील- म्हणजे सध्याच्या परिभाषेत तालुक्यातील, रांझे या गावच्या पाटलाने ‘बदअमल’ केला म्हणून त्याचे हात-पाय तोडून महाराजांनी त्याला पाटीलकीवरून काढून टाकले आणि ती पाटीलकी त्याच्याच गोतातील सोनजी बजाजी याला दिली.

    सोनजीला ‘पाटील’ म्हणून नेमल्याचे २८ जानेवारी १६४६ या तारखेचे जे पत्र महाराजांनी खेडेबारे तरफेच्या सरकारी अधिकाऱ्यांना व देशमुखांना पाठविले, ते हे पत्र. त्यात ही सर्व हकीकत नमूद केली आहे. अर्थात त्याला शिक्षा करण्यापूर्वी त्याला पकडून आणवून त्याच्या गुन्ह्य़ाची महाराजांनी चौकशी केली होती आणि त्याने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले होते, हेही त्या पत्रात सांगितले आहे.

    हे पत्र तीन कारणांकरिता महत्त्वाचे आहे : त्याची तारीख, त्यावरील शिक्कामोर्तब आणि त्यात आलेली हकीकत. महाराज त्यांना १७ वे वर्ष लागण्यापूर्वीच कारभार पाहू लागले होते, असे या पत्राच्या तारखेवरून दिसते. त्यांचे पुढील काळातील चरित्र विचारात घेतले तर पत्रातील निर्णय त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणी घेतलेला नसून त्यांनी स्वत:च घेतलेला होता असे मानण्यास हरकत नाही. 

    १९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. 

    P.V. Sukhatme IIT Bombayपोषक आहारतज्ज्ञ म्हणून नाव झालेले संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या कारकिदीर्चा आरंभ झाला तो कृषी संशोधन संख्याशास्त्रज्ञ म्हणून. लंडन युनिव्हसिर्टी कॉलेजमधून पीएच्.डी. (१९३६) व डी.एस्सी. (१९३९) ह्या अत्युच्च पदव्या संपादन केल्यावर आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गरीब जनतेस व्हावा म्हणून सुखात्मे यांनी सुखाच्या प्राध्यापकीऐवजी कर्तबगारीस आव्हान देणारं शेतकी संशोधनक्षेत्र नोकरीसाठी निवडलं. लंडनला शिकताना, विषयाच्या सैद्धांतिक बाजूऐवजी त्यांनी नमुना निवड पाहणी, सवेर्क्षणाचं पद्धतीशास्त्र अशा कौशल्यांचा उपयोग करून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, एकरी पिकांचा अंदाज, जागतिक भूक इ. सामान्य माणसाच्या जीवनाशी भिडणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडं आपल्या संशोधनाची दिशा वळवली.

    भारतात परतल्यावर 'अ. भा. स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य' या कोलकात्याच्या संस्थेत केलेल्या पहिल्याच नोकरीत, डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवातून सुखात्म्यांना सैद्धांतिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली.

    डॉ. सुखात्मे यांनी व्यावहारिक उपयोगासाठी नमुना निवड पाहणी व पद्धतीशास्त्रविषयक जे अनेक नवीन उपक्रम भारतात विकसित केले, त्यांची कीर्ती युनोच्या ‘एफएओ’पर्यंत जाऊन धडकली. त्यामुळे त्या संघटनेनं सुखात्मे यांना आग्नेय आशियातल्या सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केलं. १९४८पासून ते ‘एफएओ’चं संख्याशास्त्र प्रमुखपद स्वीकारून ते १९५१ साली रोम इथं रुजू झाले.सुखात्मे यांच्या कार्याचा व सेवेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिकांनी व सन्मानांनी गौरव करण्यात आला आहे. ‘ द वर्ल्ड्‌स हंगर अँड फ्यूचर नीड्स इन फुड सप्लाय ‘ या निबंधाबद्दल त्यांना १९६३ मध्ये रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी (लंडन) या संस्थेचे गाय सिल्व्हर पदक मिळाले. हे पारितोषिक मिळविणारे सुखात्मे पहिले भारतीय होत. विज्ञान विकास आणि मानवतेचे कल्याण यांतील असामान्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले (१९७३). 

    सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. पुढे तिथेच त्यांचे निधन झाले

    १६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले.

    श्री दासोपंत (शके १४७३ – १५३७) | श्री दत्त महाराजदासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. ते संत एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यांत आपली विशिष्टता सिद्ध करते. त्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले. 

    दासोपंतांच्या सव्वालक्ष पदांच्या अर्णवात विविध भाषांची पदे आढळतात. त्यात संस्कृत, प्राकृत, मराठी (नागर, ग्रामीण, वैदर्भीय बोली) हिंदूी (हिंदूुस्थानी विविध छटा), ब्रज, फार्सी-उर्दूमिश्रीत हिंदूी, कन्नड, तेलुगु इ. भाषावैविध्य आहे. तसेच हिंदी-मराठी या दोन भाषामिश्रित मणिप्रवाळ रचनाही आढळते. दासोपंतांचे तीर्थाटन, विविध प्रांतांतून भ्रमण आणि तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर असलेली त्यांची जन्मभूमी, महाराष्ट्रातील दीर्घकालीन वास्तव्य; यामुळे त्यांची पदरचना बहुभाषिक बनली.

    श्रीदत्तात्रेयाच्या आदेशावरून दासोपंत राक्षसभुवनी गेले तिथे गंगातीरी वाळूमध्ये दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला. आजही धाकटे देवघरी या पादुका पाहावयास मिळतात.

    दासोपंतांनी शके १५३७मध्ये, माघ वद्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. अंबेजोगाई(जिल्हा बीड) येथे नृसिंहतीर्थावर दासोपंतांची प्रशस्त समाधी आहे.


    संदर्भ

    https://www.loksatta.com/lokrang/shivaji-maharajs-first-social-letter-29990/#:~:text=%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A5%A8%E0%A5%AE%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%AC%20%E0%A4%AF%E0%A4%BE,%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4.

    https://maharashtratimes.com/editorial/manasa/-/articleshow/9677939.cms

    https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4920191856530621386

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87


  • 27 Jan 2022 5:17 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.

    बालभारतीमहाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली संस्था आहे. शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. 

    पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमती मधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार याबाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार २७ जानेवारी १९६७ ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना झाली.

    मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक १९६८ मध्ये प्रकाशित झाले. २०१३ पासून बालभारतीच्या सहाव्या मालेचे प्रकाशन सुरू आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे.

    १९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म.

    तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी |धुळे जिल्हातील पिंपळनेर येथे जन्म. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे ⇨केवलाचंद सरस्वती  यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. १९२३ साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्‍लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांच्या स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला.

    १९३० व १९३२ साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना प्रत्येक वेळी ६-६ महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. १९३६ नंतर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीचे ते क्रियाशील सदस्य झाले. १९४८मध्ये हा पक्ष विसर्जित होईपर्यंत ते त्याचे सदस्य होते. १९४० पर्यंत व पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाशी ते एक विचारवंत भाष्यकार म्हणून निगडित आहेत.

    शास्त्रीजींनी व्याख्याने, परिषदा इ. निमित्ताने भारतभर प्रवास केला. अमेरिका, ब्रह्मदेश, रशिया तसेच यूरोपीय, आशियाई आणि आफ्रिकी देशांनाही त्यानी भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून भेटी दिल्या.

    पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत १९५३ साली भारतीय राष्ट्रीयत्वावर दिलेले भाषण, किंवा पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत १९७३ साली वाचलेला ‘द कॉस्मिक स्टेट अँड कलेक्टिव्ह किंगशिप ऑफ वेदिक गॉड्‌स’ हा शोधनिबंध. शास्त्रीजींनी शेकडो व्याख्यानांच्या रूपाने व लेखनाद्वारा केलेले विचारकार्य हा महाराष्ट्राचा एक बहुमोल असा ठेवा मानला जाईल. १९७५ साली त्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांचा अमृतमहोत्सव सर्व महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त स्थापन झालेल्या अमृतमहोत्सव समितीने त्यांच्या समग्र लेखनाचे खंड प्रसिद्ध करण्याची योजना आखली आहे. ह्याच वर्षी मुंबई विद्यापीठाने एल्‌एल्‌.डी. ही सन्माननीय पदवी देऊन त्यांच्या विद्वत्तेचा यथोचित गौरव केला. संस्कृत पंडित म्हणून १९७३ मध्ये व ‘पद्मभूषण’ म्हणून १९७६ मध्ये भारत सरकारने त्यांना गौरविले. 

    १९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म. 

    श्रीधरपंत आणि इंदिराबाई वैद्य यांच्या घरी २७ जानेवारी १९२६ ला मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं अरुणकुमार.अलिबाग, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत, १९४४ साली, म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी अरुणकुमार कॅडेट बनला आणि पुढच्याच वर्षी 'डेक्कन हॉर्स' या पलटणीत दाखल झाला.अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६५ चं भारत-पाकिस्तान युद्ध.

    पंजाबमधल्या खेमकरण, असल उत्तर, चीमा या प्रांतात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तुंबळ लढाई झाली. डेक्कन हॉर्स रेजिमेंट या लढाईत कार्यरत होती आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले अरुणकुमार वैद्य. लेफ्ट. वैद्य यांना या लढाईत 'महावीर चक्र' हा दुसरा सर्वोच्च लष्करी पुरस्कार दिला गेला. या लढाईत सुमारे १०० पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले गेले तर ४० पेक्षा अधिक ताब्यात घेण्यात आले.साल १९७१, यावेळी मुख्य लक्ष पूर्व पाकिस्तानवर असलं तरी पश्चिम सीमाही पूर्णतः शांत नव्हतीच. जम्मूपासून अगदी जवळ असलेल्या शकरगढ सेक्टरमध्ये बसंतरच्या लढाईत भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तीव्र सामना झाला. एव्हाना ब्रिगेडियरपदी पोहोचलेले अरुणकुमार वैद्य या युद्धातही होते. या कामगिरीसाठी ब्रिगेडियर वैद्य यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र प्रदान केलं गेलं ज्याला सैन्याच्या परिभाषेत 'Bar to Maha Vir Chakra' असं म्हटलं जातं.


    संदर्भ

    https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3

    https://vishwakosh.marathi.gov.in/17274/

    https://www.bbc.com/marathi/india-57395180


  • 26 Jan 2022 5:43 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

    १९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.

    Independence Day: The evolution of the Indian flag to the tricolour we know | Deccan Heraldदेश स्वतंत्र झाला तरी देश चालवण्यासाठी घटना तयार नव्हती. ९ डिसेंबर १९४६ पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. १४१ दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता ३ नोव्हेंबर १९४७. पण हा काही अंतिम मसुदा नव्हता.

    डॉ. आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण १२ सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून-मापून आणि सर्व विचाराअंती लिहिण्यात आला.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.आणि २६ जानेवारी १९५० ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो. ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीत होते, तो देश प्रजासत्ताक असतो. जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात. १९५० मध्ये राज्यघटना तयार झाल्यावर गव्हर्नर जनरल हे पदच रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतील, असं जाहीर करण्यात आलं. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.

    १९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. 

    स्वर्गीय लोकनायक बापूजी अणे यांच्या आठवणी - वीणा बाळशास्त्री हरदास - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठीमूळचे आंध्र प्रदेशातील परंतु, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे स्थायिक झालेल्या ‘अणे’ कुटुंबात २९ ऑगस्ट १८८० रोजी माधव श्रीहरी उपाख्य बापुजी अणे यांचा जन्म झाला . बालपणापासून प्राचीन भारतीय संस्कृतीचे सर्व संस्कार त्यांच्यावर झाले होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चालू असताना बापूजींना त्यांच्या कुटूंबातून प्राचीन वळणाचे शिक्षण दिले गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये झाले. वैचारिक, सांस्कृतिक विषयाचे त्यांना जास्त आकर्षण होते, तसेच इंग्रजी व संस्कृत वाड:मय या विषयाकडे त्यांचा जास्त कल होता. मॉरिस कॉलेजमध्ये असताना बापूजी अणे यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला. 

    लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा व ध्येयवादाचा कायमचा ठसा बापूजींच्या जीवनावर उमटला. लोकमान्य टिळकांची राजकारणाची परंपरा तर बापूजींनी चालवलीच पण त्यांची वेद,पुराण व वाड:मयाच्या अध्ययन-संशोधनाचीही परंपरा त्यांनी पुढे चालविली. लोकमान्य टिळकांना बापूजी गुरु मानीत. महाराष्ट्रातील लोक बापूजी अणे यांना लोकमान्य टिळकांइतकाच मान देत असत आणि म्हणूनच बापूजी अणे ‘विदर्भाचे टिळक’ म्हणून देखील ओळखले जातात.

    बापूजी अणे स्वतःच्या मनाला योग्य वाटते आणि राष्ट्राला पोषक ठरते अशी कोणतीही गोष्ट करायला कधीही घाबरले नाहीत. बापूजी उदारमतवादी होते. त्यांनी प्रसिद्धीसाठी कधीही खटपट केली नाही. त्यांच्या सहवासात आलेला मनुष्य अगदी त्यांचाच होत असे. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे बापूजी अजातशत्रू ठरले. ध्येयनिष्ठा, कर्मनिष्ठा, गुरुनिष्ठा, तत्वनिष्ठा, निर्भयता, अभ्यासवृत्ती यामुळे बापूजींचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांच्यावरच्या जनतेच्या प्रेमामुळे जनतेने त्यांना ‘लोकनायक’ ही उपाधी बहाल केली होती. शिक्षक, वकील,वक्ता,साहित्यिक,संशोधक,कवी, धुरंदर राजकारणी,समाजसेवक अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पडणाऱ्या लोकनायक बापूजी अणे यांचा भारत सरकारने २६ जानेवारी १९६८ रोजी ‘पद्मविभूषण’ पदवीने सन्मान केला. तसेच त्यांच्या नावाने २९ ऑगस्ट २०११ रोजी डाक तिकीटही काढले

    संदर्भ

    https://www.bbc.com/marathi/india-47008003

    https://www.sudarshannews.in/Madhav_Shrihari_Aney_news-5932-newsdetails.aspx