Menu
Log in


Log in


इतिहासात ११ मार्च

11 Mar 2022 6:23 AM | Amol Sawarkar (Administrator)

१८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

आनंदीबाई गोपाळराव जोशी - MPSC Todayसुरूवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.

आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते.

पुढे गोपाळरावांची चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले.कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईनी एम.डी. ची पदवी मिळवली. एम.डी.साठी त्यांनी ‘‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’‘ या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

१९१५: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म. 

भारत को पहली 'विजय' दिलाने वाले थे हजारे को जन्मदिन मुबारक - happy birthday to cricketer vijay hazare - AajTakविजय हजारे यांचा जन्म मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. सांगलीतील शिक्षकाच्या आठ मुलांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता.सुरुवातीस त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. पण, त्यावेळचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डी' मेलो यांनी त्यांची समजूत काढली आणि हजारे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली.सर डॉन ब्रॅडमन सांगतात, "विजय हजारे जर कर्णधार झाले नसते तर त्यांची गणना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये केली गेली असती."विजय मर्चंट सांगतात, "कर्णधार पदाने विजय हजारेंना महान फलंदाज होऊ दिले नाही."विजय हजारे पद्मश्री किताब मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू  

१८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

१९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

१६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन. 

१९७९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.१९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन. 

संदर्भ 

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87