Log in


उभारा माणूस असण्याच्याच गुढ्या - २ एप्रिल २०२२

2 Apr 2022 8:47 AM | Anonymous

अशा उभारा तशा उभारा

माणूस असण्याच्याच गुढ्या

माणुसकीच्यासाठी वाहा

प्रेमा प्रेमाच्याच जुड्या

विटलेले ते कुस्करलेले

केलेले ते चोळामोळा

कुठल्याही रंगांचे सारे

करा करा ते ध्वजही गोळा

मिळून सारे एक उभारा

मानवतेची पुनः गुढी

सोडून सारी क्षुद्र क्षुद्रता

माणूस म्हणून घ्या उंच उडी

साऱ्यांचीच असे येथली

मिळून सारी विशाल धरती

विजय म्हणून जो मिळवायाचा

मिळवा मिळवा अपुल्यावरती

---श्रीपाद भालचंद्र जोशी