Menu
Log in


Log in


लोकमान्य - इंग्रजांच्या वर्तमानपत्रांतून

  • 14 Mar 2021
  • 5:00 PM - 6:30 PM
  • https://youtu.be/mDYMWPQRLlM

बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड ची अधिकृत स्थापना होऊन १५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त आयोजित करत आहोत एक वेगळा कार्यक्रम. स्वित्झर्लंड मध्ये मराठी समुदायाच्या एकत्रीकरणाकरता आणि मराठी संस्कृती संवर्धनाकरता आपले मंडळ स्थापन केले गेले.  

आपण ज्या भावनेतून मंडळ स्थापन केले त्याच भावनेतून १०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक सण व उत्सव या द्वारे सामाजिक ऐक्याचे आणि जनजागृती करण्याचे काम केले होते. त्यांचे शिक्षण, पत्रकारिता, साहित्य या क्षेत्रातही महत्वाचे योगदान होते. लोकमान्य टिळक यांच्या संपूर्ण कार्यावर बोलण्यासाठी एक कार्यक्रम पुरेसा नाही. आपण त्याच्या बद्दलच्या गोष्टी ऐकत आणि बघत आलो आहोत. परंतु परदेशी वृत्तपत्रांनी दखल घेतलेल्या काही व्यक्तिमत्वांमध्ये टिळक यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यावर आणि स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल लेखही लिहिले गेले. 

लंडन येथे स्थायिक असलेले इतिहास अभ्यासक श्री संकेत कुलकर्णी आपल्यासमोर अशा वेगळ्या विषयावर त्यांचे विश्लेषण सादर करणार आहेत. लोकमान्य - इंग्रजांच्या वर्तमानपत्रांतून

रविवार १४ मार्च २०२१, सायं ५ वाजता स्विस वेळ (रात्री ९:३० भारतीय वेळ) 

https://youtu.be/mDYMWPQRLlM