Log in


विनम्र अभिवादन 🙏 दया पवार

21 Sep 2019 6:01 AM | Amol Sawarkar (Administrator)

forwarded by Mr. Vijay Joshi through the BMMS Whatsapp Group

(इ.स. १९३५ - २० सप्टेंबर,१९९६)

हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.

पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवार मॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.

मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

प्रकाशित साहित्य

अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).

कोंडवाडा (कवितासंग्रह)

चावडी (कथासंग्रह)

जागल्या (कथासंग्रह)

धम्मपद (कवितासंग्रह)

पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)

पासंग(कथासंग्रह)

बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.

बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)

विटाळ (वैचारिक)

पुरस्कार

पद्मश्री

’बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)

(विकीपिडीयावरुन)

नितीन खंडाळे

- चाळीसगाव

===================

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#माझीशाळामाझीभाषा