Menu
Log in


Log in


विनम्र अभिवादन - इरावती कर्वे

15 Aug 2019 3:27 PM | Amol Sawarkar (Administrator)

forwarded by Mr. Vijay Joshi through the BMMS Whatsapp Group

(जन्म: डिसेंबर १५, १९०५,म्यानमार - मृत्यु:ऑगस्ट ११, १९७०)

या मराठी लेखिका होत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.

इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. 'चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण' हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. 'मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.

इरावती कर्वे यांचा जन्म म्यानमारमधील मिंज्यान येथे डिसेंबर १५, १९०५ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. दि.धों.कर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

त्यांना जाई, आनंद, गौरी अशी तीन अपत्ये झाली. गौरी देशपांडे या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ. आनंद कर्वे हे ॲश्डेन पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.

इरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढील प्रमाणे-

समीक्षा ग्रंथ

युगान्त १९७१ : महाभारतावरील समीक्षा ग्रंथ.

ललित लेखसंग्रह

गंगाजल १९७२

परिपूर्ती १९४९

भोवरा १९६४

समाजशास्त्रीय ग्रंथ

आमची संस्कृती

धर्म १९७१

मराठी लोकांची संस्कृती १९५१

महाराष्ट्र एक अभ्यास १९७१

संस्कृती १९७२

हिंदू समाज एक अन्वयार्थ १९७५

हिंदूंची समाज रचना १९६४

याशिवाय इंग्रजी भाषेमधूनही इरावती कर्वे यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

नितीन खंडाळे

(कॉपीपेस्ट)

=====================

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#माझीशाळामाझीभाषा