Log in


इतिहासात ६ जून रोजी

5 Jun 2021 9:12 PM | Amol Sawarkar (Administrator)

शिवराज्याभिषेक

अखेर तो दिवस उजाडला. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ आनंदनाम संवत्सर तारीख *६ जून १६७४* महाराजांनी या मंगल व पवित्र प्रभाती शुचिर्भूत होऊन श्री महादेव व कुलस्वामिनी आई भवानी यांचे दर्शन घेतले. सर्वांना मनःपूर्वक नमन करून पुढे राजांना अभिषेकासाठी सुवर्णचौकीवर बसविण्यात आले. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंडळी व उपस्थित ब्राम्हण यांच्या हस्ते महाराजांवर सुवर्णकलशातून अभिषेक करण्यात आला. सर्व पूज्य मंडळींना दिव्य वस्त्रे व दिव्य अलंकार प्रदान करून महाराज सिंहासनावर बसले.

सिंहासनाजवळ आठ खांब उभे केले होते. प्रत्येक खांबाजवळ एक असे आठ प्रधानांना उभे करण्यात आले. याच दिवशी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ स्थापित झालं. त्यात मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे, पंत अमात्य रामचंद्र बावडेकर, पंत सचिव अण्णाजी दत्तो आणि इतर मंत्री नेमले गेले. *सार्वभौम स्वराज्याला त्याचा राजा मिळाला*. 

संदर्भ : https://www.irablogging.com/blog/shivrajyabhishek-sohla-varnan

२००२: कवयित्री शांता शेळके यांचे निधन

‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारख्या लावणी, ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ यासारखी गाजलेली लोकप्रिय गीते यासारखी लिहिली आहेत ती कवियित्री शांता शेळके यांनी.

बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहे. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात . हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल मांडता येते. रोजच्या दैनदिन अनुभवाला एक मानवी,वैश्विक स्तर देवून त्यांनी ललितलेखन केले आहे. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी ,मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशिलतेतून  शांता शेळके यांनी त्यांच्या ललितलेखनातून मांडले आहेत

संदर्भ : https://marathivishwakosh.org/8966/