Menu
Log in


Log in


Geneva - Gudhi Padva & Pulotsav 2019 - Non-Member

  • 6 Apr 2019
  • 11:00 AM - 5:00 PM
  • Restaurant Indian King Curry, 4, Route de Meyrin, 1202 Geneva

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed

प्रिय मित्र-मैत्रिणींनो सप्रेम नमस्कार वि.वि ,

मराठी नव वर्षाचा पहिला सण - 'गुढी पाडवा'  रविवारी ,  एप्रिल २०१९ रोजी , Restaurant Indian King Curry, Geneva  येथे  आपण  सर्व जण  मिळून साजरा  करणार आहोत व आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे व त्यासाठी हे आग्रहाचे  निमंत्रण . 


गत वर्षाप्रमाणे गुढी उभारून  व पूजन करून  हिंदू नवीन वर्षाचे  स्वागत  करणार आहोत. 

पु लं  च्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त  पुण्यभूषण आणि आशय सांस्कृतिकच्या सौजन्य पूर्ण सहकार्याने  'जागतिक पुलोत्सव ' साजरा होत आहे.  

ह्या पुलोत्सवाचा जागतिक शुभारंभ आपण दिवाळीच्या कार्यक्रमात १० नोव्हेंबरला, झुरिच मध्ये केला होता हे आपल्याला स्मरणात असेलच.आता नवीनवर्षाचे स्वागत करू या बहुरूपी पु.ल. ह्या कार्यक्रमासह.

कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल -

प्रवेश ११.००  पासून पुढे, प्रथम घेऊ या आनंद " पुलकित रेषा " या अर्कचित्रे प्रदर्शनाचा.

११.३० ते १२.०० : गुढी आरोहण 

१२.०० ते १३.१५ :  रुचकर जेवण 

१३.१५ ते  १५.०० :  "बहुरूपी पु. लं." 

सादरकर्ते "दंगल " फेम गिरीश कुलकर्णी आणि "घाशीराम कोतवाल " फेम चंद्रकांत काळे यांच्या सोबत.

चित्रपट ,नाटक, संगीत ,साहित्य क्षेत्रातील 'पु ल अविष्कार', अभिवाचन , गाजलेली गाणी , किस्से  ह्यांचे रंगतदार सादरीकरण 

१५.१५ ते १५.३० :  चहापान - फूड स्टॉल ची सोय

१५.४५ ते १६.४५ : वक्ता दशसहस्रेषु - लघुपट 

कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कार्यकारिणीला मदत होईल. 


धन्यवाद

आपली विश्वासु,



कार्यकारिणी

बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झरलँड

Executive Committee